लिफ्टमध्ये श्वानाला अमानुष मारहाण; CCTV ने केली पोलखोल, नेटकऱ्यांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 04:54 PM2024-05-13T16:54:49+5:302024-05-13T17:04:13+5:30
सोशल मीडियावर पाळीव श्वानाला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.
Social Viral : नुकताच सोशल मीडियावर गोल्डन रिट्रीवर प्रजातीच्या एका श्वानाला अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. इंटरनेटवर एखाद्या श्वानाने माणसांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ किंवा रिल्स बऱ्याच जणांनी पाहिले असतील. दिल्ली, नोएडा याांसारख्या शहरांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रश्न ऐरणीवर आहेत. त्यातच या व्हिडिओमुळे श्वान प्रेमींमध्ये संतापाचा सुर उमटला आहे.
सध्या एक्सवर India Unites For animals Rights नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडिओमध्ये डॉग वॉकर त्या पाळीव श्वानाला लिफ्टमध्ये बेदम मारहाण करतोय. त्या श्वानाला लिफ्टमधून घरी नेत असताना त्याने केलेलं हे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे.
हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाळीव श्वानाला लिफ्टमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. तेव्हा तो माणूस निर्दयीपणे गोल्डन रिट्रीट प्रजातीच्या पाळीव कुत्र्याला पट्ट्याने मारहाण करतो. जोपर्यंत लिफ्टचा दरवाजा उघडला जात नाही तोपर्यंत तो माणूस श्वानाला मारतो. लिफ्टचा दरवाजा खुलताच काही तो काहीच झालं नसल्याचा बनाव करत तो लिफ्टमधून बाहेर पडतो.
Is there a single media house talking about this act or are they just peddling the haters agenda?
— India Unites For Animal Rights (@IUFAR2023) May 11, 2024
Since when is it acceptable to beat up a friendly dog for no reason. The dog only expresses displeasure by growling and yet follows the culprit.
AnAnimalToday
YouTomorrow pic.twitter.com/SUXsmwww8S
व्हायरल व्हिडिओ पाहून तो माणूस श्वानाला बाहेर फिरायला गेऊ गेल्याचा अंदाज लावला जात आहे. पण काही कारणावरून तो व्यक्ती श्वानावर आपला राग काढतोय. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रिपोर्टनुसार, घटनेच्या माहिती मिळताच त्या माणसाला कामावरून काढण्यात आल्याचं सागंण्यात येत आहे. एका मुक्या प्राण्यासोबत असं निर्दयीपणे कोणीच वागू शकत नाही.