वसा पशुसेवेचा! डोईवर मुंडावल्या, हातात स्टेटस्कोप घेत नवरदेव पोहचला पशुसेवेसाठी, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 05:00 PM2024-06-17T17:00:22+5:302024-06-17T17:09:56+5:30
एखाद्या माणसाचा अपघात झाला किंवा त्याच्यावर कोणता प्रसंग ओढावला तर सगळेच त्याच्यासाठी धावून येतात.
Social Viral : एखाद्या माणसाचा अपघात झाला किंवा त्याच्यावर कोणता प्रसंग ओढावला तर सगळेच त्याच्यासाठी धावून येतात. त्याची मोठ्या आपुकीने चौकशी केली जाते. पण याउलट निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या किंवा अपघात, नैसर्गिक आपत्तीमध्ये जखमी झालेल्या मुक्या प्राण्यांना कोणीही वाली नसतो. या मुक्या जनावरांच्या मदतीला कोणीही पुढे सरसावत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा पशुवैद्यकाचा व्हिडिओ याला अपवाद ठरला आहे.
नेटकरी हा व्हिडिओ पाहून भारावून गेल्याचं पाहायला मिळतं आहे. नक्की या पशुवैद्यकाने असं काय केलं? याचा अंदाज हा व्हिडिओ पाहून तुम्हाला येईल.
स्वत: च्या लग्नाच्या दिवशी एका आजारी असलेल्या गायीसाठी हा तरूण देवदूत ठरला. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगाची पर्वा न करता त्याने चोखपणे आपलं कर्तव्य बजावलं. व्हिडिओमध्ये हा नवरदेव लग्नाच्या पेहरावात असल्याचं दिसून येत आहे. पशुसेवेचा वसा घेत हा नवरदेव उपचारासाठी बाईकवर निघाला. डोईवर मुंडावल्या, हातात स्टेटस्कोप घेत या नवरदेवाने आपल्या कर्तव्याला पहिलं प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय. वेळेवरच उपचार मिळाल्याने व्हिडिओमध्ये दिसणारी गाय थोडीफार सावरली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.
आधी पशूसेवा नंतर लगीन असा संदेश देणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आला आहे. नेटकऱ्यांनी तर या नवरदेवाचं तोंड भरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी "गौमातेच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण होतील" तसेच " पशुसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा हे व्रत्त या भाऊंनी हाती घेतले आहे याला जगामध्ये तोड नाही खूप छान काम करतात भाऊ " अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.