कॅमेऱ्याकडे पाहत मॅडमची सुपरफास्ट पेपर तपासणी; नेटकऱ्यांनी घेतली शाळा, Video पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:48 IST2024-05-28T15:41:20+5:302024-05-28T15:48:56+5:30
अलिकडेच बिहारच्या एका शिक्षिकेचा सुपरफास्ट पेपर तपासणीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या नजरेत आलाय.

कॅमेऱ्याकडे पाहत मॅडमची सुपरफास्ट पेपर तपासणी; नेटकऱ्यांनी घेतली शाळा, Video पाहा
Social Viral : सोशल मीडियामुळे जग किती जवळ आलंय नाही! जगाच्या पाठीवर कुठे काय चाललंय याची पुरेपूर माहिती या माध्यमातून मिळते. सोशल मीडियावर रिल्स बनविण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. अलिकडेच बिहारच्या एका शिक्षिकेचा सुपरफास्ट पेपर तपासणीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या नजरेत आलाय. सध्या ही रिल चांगलीच चर्चेत आली आहे. त्यात एक शिक्षिका उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहे.
नुकताच राज्य शिक्षण मंडळाचा दहावी-बारावीच्या निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावी-बारावीचा निकाल अगदी वेळेतच लावता यावा असा शिक्षण विभागाचा मानस होता. अशातच विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवत शंभर नंबरी कामगिरी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका शिक्षिकेच्या व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पीपीयू एग्जाम का कॉपी जांचने का रील्स इंस्टाग्राम पर वायरल, मैडम पर FIR दर्ज। pic.twitter.com/GlnZhH4Yuk
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) May 26, 2024
छपरा जिल्हा नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती पर्यवेक्षक शिक्षिका कॅमेऱ्याकडे बघत असून उत्तरे न पाहता, न वाचता गुण देत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्या ठिकाणी इतरही शिक्षक उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत. अतिशय बेजबाबदारपणे ती गुण देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याला धोका आहे, असे अनेकांनी म्हटले.
हा व्हायरल व्हिडीओ बिहारमधील असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या शिक्षेकेच्या अशा वर्तवणुकीवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या व्हिडीओची दखल घेत शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवळपास ४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. परखड शब्दांत कमेंट करत नेटकऱ्यांनीच शिक्षिकेची शाळाच घेतली आहे. हा व्हिडिओ पाहून अशा पद्धतीने पेपर तपासले गेले असतील तर विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स का मिळणार नाहीत? अशी शंका देखील काहींनी व्यक्त केली आहे.