building collapse: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 04:06 PM2022-12-06T16:06:17+5:302022-12-06T16:08:11+5:30
सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही
Video of building collapse: देशाची राजधानी दिल्लीत चार मजली इमारत कोसळली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत सदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. इमारत कोसळण्याच्या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ही इमारत स्थानिक बिल्डरने बांधली होती, जी MCDने धोकादायक घोषित केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सोमवारी सकाळी उत्तर दिल्लीतील शास्त्रीनगर भागात घडले. सकाळची वेळ असल्याने फार कमी लोक घराबाहेर पडले होते, त्यामुळे रस्त्यावर खूप कमी लोक उपस्थित होते. त्याच वेळी लोकांना चार मजली इमारतीत काही हालचाल दिसली, त्यावेळी लोक दूर गेले आणि काहींनी मोबाईलवरून व्हिडिओ बनवले.
सोमवारी सकाळी दिल्लीतील शास्त्रीनगर भागात ही घटना घडली. सहा महिन्यांपूर्वी एमसीडीने ही इमारत धोकादायक घोषित केली होती, मात्र हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने इमारत पाडता आली नाही. इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. एका बांधकामाधिन इमारतीचेही नुकसान झाले. दिल्लीच्या शास्त्रीनगर भागातील हा १० सेकंदाचा व्हिडिओ पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पाहा व्हिडीओ-
#WATCH दिल्ली: उत्तर दिल्ली के शास्त्री नगर में चार मंजिला इमारत गिरी। पुलिस द्वारा वीडियो की पुष्टि की गई।
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2022
(वीडियो सोर्स: स्थानीय) pic.twitter.com/qI5PwkS1ED
कोणत्याही संरक्षणाशिवाय चार मजली इमारत अचानक कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळण्याच्या १० मिनिटे आधी दुर्घटना घडण्याची भीती होती. लोकांनी घाईघाईत तेथून वाहने हटवली, पण रस्त्यावरील हालचाली थांबल्या नाहीत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ३ महिला रस्त्यावरून येत होत्या. १० सेकंदानंतर इमारत कोसळली. हा निष्काळजीपणा असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना तडे गेले असून, जीवितहानीही होऊ शकते, असे बोलले जात आहे.