VIDEO : धडक लागल्यानंतर कारच्या बोनटमध्ये अडकला बिबट्या, लोकांना वाटलं जीव गेला पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 04:49 PM2022-06-22T16:49:16+5:302022-06-22T16:55:54+5:30

Leopard Accident Video : बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयएएफ अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. सुशांत नंदा यांनी याच घटनेचा एक दुसरा व्हिडीओही शेअर केला आहे.

Viral video of leopard gets hit by car on highway watch trending video | VIDEO : धडक लागल्यानंतर कारच्या बोनटमध्ये अडकला बिबट्या, लोकांना वाटलं जीव गेला पण...

VIDEO : धडक लागल्यानंतर कारच्या बोनटमध्ये अडकला बिबट्या, लोकांना वाटलं जीव गेला पण...

Next

Leopard Accident Video : तुम्ही रस्त्यांवरून अनेक प्राण्यांना जाताना पाहिलं असेल. अनेकदा प्राण्यांमुळे मोठ मोठे अपघातही होतात. तर अनेकदा मुक्या जनावरांनाही आपला जीव गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक बिबट्या कारच्या बोनटमध्ये अडकतो. टक्कर झाल्यावर बिबट्या कारच्या पुढेच्या भागात फसला आहे.

बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयएएफ अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. सुशांत नंदा यांनी याच घटनेचा एक दुसरा व्हिडीओही शेअर केला आहे. या दुसऱ्या व्हिडीओत बिबट्या घटनेनंतर कारच्या बोनटमधून बाहेर निघून जंगलाकडे पळून जाताना दिसत आहे. बिबट्याचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ पुणे-नाशिक हायवेवरील आहे. कारसोबत टक्कर झाल्याने बिबट्या गंभीर जखमी झाला आहे आणि कारचा समोरचा भागही डॅमेज झाला आहे. व्हायरल व्हिडीओत स्पष्टपणे बघू शकता की, बिबट्या अर्धा कारच्या बोनट-बंपरच्या खाली फसला आहे. बिबट्या अडकल्याचं पाहून ड्रायव्हर कार मागे घेतो, तेव्हा बिबट्या तिथून निसटण्यात यशस्वी ठरतो.

अभिनेत्री रवीना टंडन हिनेही पळूत जात असलेल्या बिबट्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं की, 'आशा आहे की, तो जगेल. भलेही तो गंभीरपणे जखमी झाला असेल, तो जंगलात पळून जाईल. मला आशा आहे की, राजकीय नेते हे बघून जागे होतील आणि संरक्षण पद्धतीचा विचार करतील'.

Web Title: Viral video of leopard gets hit by car on highway watch trending video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.