सर्वत्र दाटले धूके...  ट्रक क्लिनरने लढवली अशी शक्कल 'Video' होतोय व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:31 AM2024-01-17T11:31:50+5:302024-01-17T11:32:59+5:30

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.

Viral Video of man doing stunt on running ttuck on road standing infront of truck  | सर्वत्र दाटले धूके...  ट्रक क्लिनरने लढवली अशी शक्कल 'Video' होतोय व्हायरल 

सर्वत्र दाटले धूके...  ट्रक क्लिनरने लढवली अशी शक्कल 'Video' होतोय व्हायरल 

Viral Video : सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. संपूर्ण वातावरण गारेगार झाल्याचही पाहायला मिळतंय. सर्वत्र दाट धूक्याची चादर पसरली आहे. त्याचा परिणाम हा रेल्वे, विमान वाहतूकीसह रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. धुक्यामुळे अनेक ठिकाणी अपघात झाल्याचेही घटना समोर आल्यात.  मात्र, या धुक्यामुळे ट्रक चालकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एका ट्रकवरील सहकाऱ्याने जीवघेणा प्रयोग केला. त्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या ट्रकच्या बोनेटवर म्हणजेच समोरील बाजुस उभा आहे. तो धुक्यातून मार्ग काढताना पुढे काही अडथळा आहे की नाही, याबाबत चालकाला माहिती देताना दिसतो. 
काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ  पाहून अंगावर काटाच येईल. 

जीवावर बेतणारे साहस करणारा तो व्यक्ती सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या नजरेत आलाय. परंतु त्याचा तोल गेल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या धुक्यामुळे एकीकडे अपघाताचे प्रमाण वाढतच चाललंय. पण असं असतानाही काही लोकांना स्टंटबाजी करण्याचं भलतंच वेड असत.  

पाहा व्हिडीओ :  

काहीतरी जगावेगळं करण्याच्या नादात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. पण परिस्थितीचे गांभीर्य कोणालाच राहिलेलं दिसत नाही. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. शिवाय या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूल घातला आहे.

Web Title: Viral Video of man doing stunt on running ttuck on road standing infront of truck 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.