Video: मुंबईतल्या सिक्युरीटी गार्डने गायलं सुरेश वाडकर यांचं गाणं; रस्त्यावरून जाणारेही थांबून ऐकू लागले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:28 PM2023-05-03T16:28:28+5:302023-05-03T16:29:15+5:30
हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय, तुम्ही पाहिलात का?
Security Guard Singing, Viral Video: प्रत्येकाला आपल्या आवडत्या कलाकारांना नाचताना किंवा गाताना पाहणे आवडते. पण असे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपली कला दाखवणारे लोक व्यावसायिक कलाकारांना स्पर्धा देताना दिसतात. मग ते चालत्या ट्रेनमध्ये सिद्धू मुसेवालाचे गाणे गाणारे लहान मूल असो, दात घासताना आपल्या आवाजाची जादू पसरवणारा बिहारचा मुलगा असो किंवा शेतात बसून मधुर आवाजात गुंजन करणारी आजी असो. अशा लोकांची प्रतिभा पाहून जनता थक्क होते. आता एका सुरक्षारक्षकाचे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आवाज ऐकून मन प्रसन्न होईल!
व्हायरल व्हिडिओ दीपिका (@Konjunktiv_II) नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी काम केलेल्या कोणत्याही कार्यालयात सुरक्षा रक्षकाला त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक बाजू अशा प्रकारे व्यक्त करू दिलेली नाही. मोठ्या ऑफिसमध्ये टॅलेंट शो व्हायलाच हवेत. परंतु गार्ड किंवा हाऊसकीपिंग कर्मचार्यांना हजर राहण्यासाठी हा पर्याय छान आहे. ड्युटीवर असताना गार्डला गाण्याची परवानगी देणाऱ्या व्यक्तीला सलाम. या अवघ्या ५५ सेकंदांच्या क्लिपमध्ये मुंबईतील आयएमसी (इंडियन मर्चंट्स चेंबर) चा एक सुरक्षा रक्षक 'उत्सव' चित्रपटातील गाणे गाताना दिसतो.
Why not!
— Deepika (@Konjunktiv_II) May 1, 2023
None of the offices I've worked in would ever have let their security guards express a side to their personality this way. We'd have talent shows but never for security or housekeeping staff to participate. Kudos to the person in IMC who signed off on this. pic.twitter.com/M8WtKM5Tno
रस्त्यावरील लोक थांबून करतात वाहवा!
एका कार्यालयाच्या गेटवर गार्ड उभा असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या हातात माईक आहे आणि तो 1984 मध्ये आलेल्या 'उत्सव' चित्रपटातील 'सांझ ढले गगन तले' गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचा आवाज ऐकून रस्त्यावरून चालणारे लोक थांबतात आणि ऐकू लागतात. यावरून गार्डने आपल्या मधुर आवाजाने मन जिंकण्यात यश मिळवले आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला ट्विटरवर 1 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच यूजर्स त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. उत्कृष्ट गायन आहे असे बहुतेक लोक कमेंट करत आहेत.