Viral Video: पोलीस पाठलाग करत असताना बाईकस्वाराने असं काही केलं की अधिकारीही चक्रावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:40 PM2022-08-22T19:40:12+5:302022-08-22T19:40:38+5:30

बाईकस्वार असं काही करेल असं पोलिसांनीही वाटलं नसेल

Viral Video of Thief escapes on bike while Police Van follows him watch his unique style | Viral Video: पोलीस पाठलाग करत असताना बाईकस्वाराने असं काही केलं की अधिकारीही चक्रावले...

Viral Video: पोलीस पाठलाग करत असताना बाईकस्वाराने असं काही केलं की अधिकारीही चक्रावले...

Next

Biker Viral Video: जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे असे लोक ज्यांचा पोलीस पाठलाग करू लागले की ते घाबरतात आणि गपचूप शरण जातात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक असे असतात जे पोलिसांनी पाठलाग केला तरी अजिबात घाबरत नाहीत. उलट हे लोक पोलिसांचा डोळा चुकवून काही ना काही जुगाड करून पोलिसांपासून निसटण्यात यशस्वी होतात. अशाच एका व्यक्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत तो पोलिसांना चुकवून कसा पळून जातो, हे पाहून सारेच चक्रावतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करत आहेत. दुचाकीस्वार वेगाने बाईक पळवत असताना पोलिसांनी व्हॅनदेखील वेगाने त्याचा पाठलाग करत आहे. पण याच दरम्यान तो बाईक स्वार अचानक आपली बाईक एक वेगळ्या मार्गावर नेतो. डावीकडच्या एका रस्त्यावर बाईक गेल्यानंतर तेथे एक कार उभी असते. पोलिसांची व्हॅन वेगाने त्या बाईकस्वाराचा पाठलाग करते. पण तो बाईकस्वार पोलिसांची नजर चुकवून तिथून पळ काढतो. पाहा तो नक्की काय करतो...

बाईकस्वार जी शक्कल लढवून पळ काढतो त्यानंतर पोलिसांची व्हॅन जाग्यावरच थांबते. बाईक ज्या स्पीडने वळसा घालून निघून जाते त्यापुढे पोलिसांची व्हॅन हतबल होते कारण त्यांनी वळसा घालण्यासाठी तितकी जागाच दिसत नाही. त्यामुळे बाईकस्वार तेथून पसार होतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून त्याला आतापर्यंत २५ दशलक्ष व्ह्यूज आणि २.८ दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत.

Web Title: Viral Video of Thief escapes on bike while Police Van follows him watch his unique style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.