काय सांगता! ब्रिटनच्या पंतप्रधानांवर आली स्वतःच्याच घराबाहेर थांबण्याची वेळ; 'Video' होतोय व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 02:55 PM2023-12-10T14:55:53+5:302023-12-10T14:57:47+5:30
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर स्वतःच्याच घराबाहेर उभे राहण्याची वेळ का बरं आली असेल? जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय...
Viral Video : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. ऋषी सुनक यांना स्वतःच्याच घराबाहेर काही वेळ उभे राहावे लागले असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि विधानांमुळे चर्चेत असणारे ऋषी सुनक यांचा नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटेंसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सुनक हे मार्क रुटे यांचे स्वागत करताना त्यांच्या घराचा दरवाजा अचानक बंद झाला. बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला नाही.
दरम्यान, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांचे स्वागत करण्यासाठी ऋषी सुनक घराबाहेर (१० डाउनिंग स्ट्रीट) आल्यानंतर काही क्षणात घराचा दरवाचा बंद झाला. त्यामुळे ऋषी सुनक यांची तारांबळ उडाली. दरवाजा उघडण्यासाठी ऋषी सुनक यांनी केलेली खटपट मीडियाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्यासमोर हा संपूर्ण प्रकार घडला.
या व्हायरल व्हिडीओमध्ये ऋषी सुनक प्रचंड अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळते आहे. अचानक लॉक झालेल्या दरवाज्यामुळे सुनक आणि मार्क रुटे यांच्यावर घराबाहेर उभे राहण्याची वेळ आली. वारंवार घराचा दरवाजा ठोठावून सुद्धा कोणीही दाद देत नसल्याने दोन्ही नेत्यांचा गोंधळ उडून गेला. अखेरीस काही वेळानंतर सुनक यांच्या घरातील एका सुरक्षारक्षकाने हा दरवाजा उघडला. तांत्रिक अडचणींमुळे दरवाजा बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
येथे पाहा व्हिडीओ :
Rishi Sunak appeared to be locked out of Number 10 as he welcomed his Dutch counterpart Mark Rutte.
— Sky News (@SkyNews) December 8, 2023
The pair met to discuss 'the scourge of illegal migration' and the UK's Rwanda policy, as well as the conflict in the Middle East and Ukraine.https://t.co/xItZsH7teapic.twitter.com/63JM4YpC4v