VIDEO : या काकांच्या केसांनाही धक्का लावणार नाही कोरोना, हाता-तोंडाला लावून घेतलं सॅनिटायजर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 02:06 PM2021-06-11T14:06:40+5:302021-06-11T14:09:35+5:30
हॅंड सॅनिटायजर हे अर्थातच हातांवर लावण्यासाठी असतं. पण एका वयोवृद्धाला कदाचित हे माहीत नसेल की, ते केवळ हातांवर लावलं जातं.
देशात कोरोना महामारीमुळे लोकांच्या लाइफस्टाईलपासून ते खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. इतकंच काय तर लोकांच्या प्रायोरिटीही बदलल्या आहेत. कोरोनामुळे मास्क आणि सॅनिटायझर लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झालं आहे. बाहेर कुठेही दुकानात गेला तर हॅंड सॅनिटायजर ठेवलेलं दिसेल. लोकही खिशात सॅनिटायजर घेऊन फिरतात.
हॅंड सॅनिटायजर हे अर्थातच हातांवर लावण्यासाठी असतं. पण एका वयोवृद्धाला कदाचित हे माहीत नसेल की, ते केवळ हातांवर लावलं जातं. सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती व्यक्ती सॅनिटायजर हातावर, चेहऱ्यावर, केसांवर, पायांना लावताना दिसत. ज्याप्रमाणे आपण एखादं क्रीम शरीरावर लावतो तसं ते सॅनिटायजर लावताना दिसत आहेत.
*इसका Corona बाल भी बाका नहीं कर सकता 😆😆*
— Rupin Sharma IPS (@rupin1992) May 29, 2021
पर #मास्क नीचे नहीं करना था चाचा pic.twitter.com/WVXxGCpMfS
५० सेकंदाचा हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, 'कोरोना याच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. फक्त खाली करायचा नव्हता काका'. बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि लोक त्यावर भरभरून कमेंट्स करत आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत याला ५ हजार ३०० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ रिट्विटही केलाय. एका यूजरने लिहिले की, 'या व्यक्तीला सांगायला हवं होतं की, सॅनिटायजर कसं वापरायचं'. तर एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, 'चचा का संपूर्ण सुरक्षा कवच-- सैनिटाइजर 2020 से कीटाणुओं को मार रहा है।'