Snake eating snake Viral Video: बापरे! बघता-बघता एका सापाने दुसऱ्या सापाला चक्क जिवंत गिळून टाकलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 17:20 IST2022-10-10T17:19:13+5:302022-10-10T17:20:28+5:30
हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

Snake eating snake Viral Video: बापरे! बघता-बघता एका सापाने दुसऱ्या सापाला चक्क जिवंत गिळून टाकलं...
Snake swallowed snake Viral Video: वन्यप्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओंमध्ये दोन प्राण्यांमध्ये उत्कंठावर्धक संघर्ष पाहायला मिळतो, तर काहींमध्ये अतिशय धक्कादायक दृश्ये असतात. सध्या अशाच एका सापाच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे डोके चक्रावून टाकले आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक साप दुसऱ्या सापाला जिवंत गिळताना दिसत आहे. काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटच्या जगात दहशत निर्माण करणारी नक्कीच आहे, पण तरीही या व्हिडिओला ४ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झुडपात लपलेला लाल रंगाचा साप आपल्यासारख्याच दुसऱ्या सापावर हल्ला करतो. त्यानंतर तो हळूहळू दुसऱ्या सापाला गिळण्यास सुरुवात करतो. व्हायरल क्लिपमध्ये सापाने दुसर्या सापाला ज्या प्रकारे जिवंत गिळले ते पाहून लोकांची चांगलीच दातखिळ बसू शकते. तसे, वन्यजीव अभ्यासकांच्या मते, सापांच्या बाबतीत ही नवीन गोष्ट नाही. अनेकदा असे दिसून आले आहे की जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागते किंवा राग येतो तेव्हा ते इतर सापांना त्यांचे भक्ष्य बनवतात. पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ-
सापाचा हा खतरनाक व्हिडिओ wild_animal_pix नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांची ही क्लिप लोकांना किती आवडली आहे, याचा अंदाज १.३ लाख लोकांच्या लाइक्सवरून लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.