VIDEO : पाकिस्तानी तज्ज्ञांनी भारत-पाक केळींची केली तुलना, इशारे बघून न्यूज अॅंकरला कोसळलं हसू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 04:59 PM2021-11-02T16:59:32+5:302021-11-02T17:15:26+5:30
Pakistan News Channel Viral Video : पाकिस्तानात या मुद्द्यांवर अशी चर्चा होते की, बघणारे-ऐकणारे हसून हसून लोटपोट होतात. असाच एक टीव्हीवरील चर्चेचा विषय असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विषय शेतीचा असो वा अर्थव्यवस्था सुधारणेचा किंवा विकासाचा सामान्य लोकांसाठी ही चर्चा कंटाळवाणी असते. पण पाकिस्तानात असं नाही. पाकिस्तानात (Pakistan) या मुद्द्यांवर अशी चर्चा होते की, बघणारे-ऐकणारे हसून हसून लोटपोट होतात. असाच एक टीव्हीवरील चर्चेचा विषय असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानातील एका चॅनलवर केळींवर चर्चा झाली होती. या चर्चेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. न्यूज चॅनलमध्ये आलेल्या एका तज्ज्ञांनी भारतीय केळींना पाकिस्तानच्या केळींपेक्षा असं काही चांगलं असल्याचं सांगितलं की, न्यूज अॅंकर लोटपोट होऊन हसू लागली.
And the winner is, Bombay 🍌 pic.twitter.com/wJB8lqzODa
— Naila Inayat (@nailainayat) November 1, 2021
पॅनलिस्ट ख्वाजा नावेद पाकिस्तानात केळीच्या व्यापाराला वाढवण्याबाबत बोलत आहेत. यादरम्यान ते म्हणाले की, मुंबईची केळी पाकिस्तानातील केळीपेक्षा मोठी असतात. मुंबईचे केळ जर रूममध्ये पडून असले तर सुंगध पसरतो. तेच ढाका येथील केळही मोठे असतात.
झालं असं की, ख्वाजा नावेद न्यूज एंकरला हातांनी इशारे करत सांगत होते. ते म्हणाले की, मुंबईची केळी इतकी मोठी असतात आणि सिंधमधील केळी बोटा इतकी असतात. यावर न्यूज अॅंकर काही वेळ आपलं हसू रोखण्याचा प्रयत्न करते. पण हे सगळं इतकं मजेदार होतं की, ती जोरात हसू लागते. अलवीनाला हसताना पाहून पॅनलिस्टही हसतात.