महिला खासदार म्हणाल्या, "माझ्या डोळ्यात बघा सर...", पाकिस्तानी संसदेतील व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:58 PM2024-07-02T12:58:08+5:302024-07-02T13:00:00+5:30

Pak MP Viral Video :या संसदेतील एक महिला खासदार बोलता बोलता स्पीकरना तिच्या डोळ्यात बघत तिचं म्हणणं ऐकण्यास सांगतात. तेव्हा त्यावर स्पीकर काय म्हणतात ते व्हायरल झालं आहे. 

Viral Video : Pakistan Woman Leader Viral Video in Parliament Speaker Says Cannot Eye Contact | महिला खासदार म्हणाल्या, "माझ्या डोळ्यात बघा सर...", पाकिस्तानी संसदेतील व्हिडीओ व्हायरल...

महिला खासदार म्हणाल्या, "माझ्या डोळ्यात बघा सर...", पाकिस्तानी संसदेतील व्हिडीओ व्हायरल...

Pak MP Viral Video : संसदेचं कामकाज कसं चालतं याचे भारतातील किंवा इतर देशांमधीलही व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी खासदार आणि अध्यक्षांमध्ये वादावादी होते तर कधी सदस्यांमध्ये. पाकिस्तानाच्या संसदेतीलही व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

या संसदेतील एक महिला खासदार बोलता बोलता स्पीकरना तिच्या डोळ्यात बघत तिचं म्हणणं ऐकण्यास सांगतात. तेव्हा त्यावर स्पीकर काय म्हणतात ते व्हायरल झालं आहे. 

या महिलेचं नाव जरताज गुल आहे ज्या इम्रान खान यांच्या कॅबिनेटमध्येही होती. सभागृहात जरताज गुल म्हणतात की, "माझ्या नेत्यांनी मला शिकवलं आहे की, समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. मला जे बोलायचं आहे ते तुम्ही मी पूर्ण करू शकणार नाही जर तुम्ही माझ्या डोळ्यात बघणार नाही. प्लीज तुमचा चष्मा घाला".

जरताज गुल यांचं बोलणं ऐकल्यावर सभापतींनीही त्यावर उत्तर दिलं. ते म्हणाले की, "मी तुमचं सगळं म्हणणं ऐकत आहे. पण मी तुमच्या डोळ्यात बघू शकत नाही. एका विवाहित महिलेच्या डोळ्यात बघणं बरोबर नाहीये". यावर खासदार गुल म्हणतात की, "जर तुम्ही ५२ टक्के महिलांसोबत असंच बोलाल तर काही लोकच भवनात चर्चेत सहभागी होऊ शकतील". या व्हिडिओला ट्विटर म्हणजे आताच्या एक्सवर १.३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.

Web Title: Viral Video : Pakistan Woman Leader Viral Video in Parliament Speaker Says Cannot Eye Contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.