चरणामृत समजून भाविक प्यायले एसीचं पाणी, बांके बिहारी मंदिरातील व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 11:39 AM2024-11-04T11:39:13+5:302024-11-04T11:45:09+5:30
Viral Video: भाविकांची अशी धारणा आहे की, हे पाणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणांमधून निघालेलं चरणामृत आहे. हा सगळा प्रकार बांके बिहारी मंदिरात समोर आला.
Viral Video: उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये वृंदावनच्या एका प्रसिद्ध मंदिरात हत्तीच्या मूर्तीच्या तोंडातून येणारं पाणी पिण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. भाविकांची अशी धारणा आहे की, हे पाणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणांमधून निघालेलं चरणामृत आहे. हा सगळा प्रकार बांके बिहारी मंदिरात समोर आला. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, भाविक भिंतीवरील हत्तीच्या मूर्तीच्या तोंडात येणारं पाणी पित आहे. डोक्यावर घेत आहेत. एका रिपोर्टनुसार, हे पाणी हत्तीच्या आकाराच्या पाईपमधून वाहत होतं, जे मंदिराच्या वास्तुकलेचा भाग आहे.
मात्र, ज्या पाण्याला भाविक चरणामृत समजत होते, ते मुळात एसीमधून निघणारं डिस्चार्ज वॉटर म्हणजे पाणी आहे. व्हिडिओत एक व्यक्ती काही भाविकांना हे सांगताना ऐकू येत आहे की, जे पाणी तुम्ही पित आहात ते मुळात एसीचं पाणी आहे. या व्यक्तीने सांगितल्यानंतरही लोक हे पाणी पित राहिले आणि अंगावर शिंपडत राहिले.
Serious education is needed 100%
— ZORO (@BroominsKaBaap) November 3, 2024
People are drinking AC water, thinking it is 'Charanamrit' from the feet of God !! pic.twitter.com/bYJTwbvnNK
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला एक्सवर २.८ मिलियन वेळा बघण्यात आलं आहे. तर व्हिडिओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये यूजर्सनी भाविकांच्या या अंधश्रद्धेवर कमेंट्स केल्या आहेत. तसेच लोकांमध्ये असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची कमतरता याबाबतही कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, "कुणीही एक सेकंद थांबून हा विचार करत नाहीये की, हे काय होत आहे? ही कसली मानसिकता आहे".