पाहावं ते नवलंच! उष्णतेपासून वाचण्याचा 'देसी जुगाड', व्हिडिओ पाहून व्हाल चकीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 06:09 PM2024-04-28T18:09:53+5:302024-04-28T18:10:40+5:30
Viral Video: व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral Video: यंदा गरमी प्रचंड वाढली आहे. गरमीपासून वाचण्यासाठी लोक विविध प्रकारचे जुगाड करत आहेत. असाच एक देसी जुगाड सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, सध्या भारतीय सोशल मीडियावर 'India is not for beginer' ट्रेंड करत आहे. या कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने कडक उन्हापासून वाचण्यासाठी असे उपकरण बनवले, ज्याच्या सहाय्याने तुम्ही आपल्या घराचे छत कडक उन्हातदेखील थंड ठेवू शकता. या व्यक्तीने आपल्या घराच्या छतावर पाण्याचे पाईप्सद्वारे कारंजे लावले. त्यामुळे पाणी पावसाच्या थेंबाप्रमाणे छतावर पडत राहते. विशेष म्हणजे, हे उपकरण इतके साधे आहे की, कोणीही सामान्य माणूस आपल्या घराच्या छतावर बसवू शकतो.
या पाण्याच्या फवारणीमुळे गरम छत काही क्षणात थंड होऊ शकते आणि यामुळे जास्त पाणीदेखील वाटा जात नाही. या व्यक्तीने केलेला देसी जुगाड पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @adultsociety नावाच्या पेजने शेअर केला आहे. या व्हिडिओला 16 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर अनेकजण यावर कमेंट्स करुन आपली प्रतिक्रिया देत आहेत.