Viral Video : पोल डान्स करताना १५ फुटावरून खाली पडली डान्सर आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 04:17 PM2020-02-14T16:17:43+5:302020-02-14T16:21:29+5:30

वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये अचानक होत असलेले धक्कादायक अपघात आपण नेहमीच बघत असतो. अशाच एका पोल डान्सरच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे.

Viral Video: Pole dancer fall from 15 foot in America she continues to dance | Viral Video : पोल डान्स करताना १५ फुटावरून खाली पडली डान्सर आणि....

Viral Video : पोल डान्स करताना १५ फुटावरून खाली पडली डान्सर आणि....

googlenewsNext

वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये अचानक होत असलेले धक्कादायक अपघात आपण नेहमीच बघत असतो. अशाच एका पोल डान्सरच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे. ही पोल डान्सर क्लबमध्ये परफॉर्म करत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती १५ फुटावरून खाली स्टेजवर पडली. यामध्ये तिचा जबडा फुटला असून दात-ओठांना देखील मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. 

अपघातानंतर तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात पोल डान्सरच्या जबड्याजवळ टाके पडले आहेत. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही घटना घडली. जीनिया असं या पोल डान्सरचं नाव आहे. पोलवर 15 फुटांवर उलटी लटकून ती डान्स करत होती. त्यावेळी तिचा तोल गेला आणि क्षणार्धात ती खाली कोसळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर 10 मिलीयनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

जीनियाच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी याकरता अनेकांनी प्रार्थना केली आहे. सोशल मीडियावरही त्यांनी कमेंट्स करुन त्याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर जीनियाने आपल्या चाहत्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला. तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे आभार देखील जीनियाने मानले आहेत. 

अमेरिकेत कर्मचाऱ्यांना अपघातानंतर उपचारासाठी विम्याची ठराविक रक्कम मिळते. मात्र ज्या कॅबरेमध्ये जीनिया डान्स करायची त्या कॅबरेने या घटनेची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे जीनिया त्यांची कायमस्वरुपी कर्मचारी नसल्यामुळे नुकसान भरपाई देण्यासही नकार दिला आहे.


Web Title: Viral Video: Pole dancer fall from 15 foot in America she continues to dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.