Viral Video : कुंभमेळ्यात जाण्यापूर्वीच 'प्रसाद'! रेल्वेची काच तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी धो-धो धुतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:18 IST2025-02-17T17:17:10+5:302025-02-17T17:18:48+5:30
दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, यात पोलिसांनी एका व्यक्तीला ट्रेनची काच फोडण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले.

Viral Video : कुंभमेळ्यात जाण्यापूर्वीच 'प्रसाद'! रेल्वेची काच तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी धो-धो धुतला
प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. जगभरातील भाविक येथे श्रद्धा-स्नानासाठी जात आहेत. दरम्यान प्रयागराज आणि दिल्लीत चेंगराचेंगरीच्या घटा घडल्या. यामुळे लोक सोशल मीडियावर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. याच वेळी, ट्रेनमधील गर्दी आणि गैरव्यवस्थेचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर फिरत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, यात पोलिसांनी एका व्यक्तीला ट्रेनची काच फोडण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी तरुणाला रंगेहात पकडलं -
एका रेल्वे स्थानकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे, यात एक तरुण जागा न मिळाल्याने ट्रेनच्या काचेवर जोरजोरात मारताना दिसत आहे. यानंतर त्याला पोलीस पकडतात आणि तेथेच त्याची धुलाईही होते. या व्हिडिओमध्ये पोलीस संबंधित तरुणाची कॉलर पकडून त्याला घेऊन जातानाही दिसत आहेत.
लोकांकडून पोलिसांचं कौतुक-
हा व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लोक पोलिसांचे कौतुक करताना दिसत आहेत. एक युजरने म्हले आहे, अशा लोकांसोबत असेच व्हायरल हवे. एका युजरने म्हटले आहे, चालला होता हिरो बनायला, पोलिसांनी व्हिलन बनवला. तसेच, पोलिसा ठाण्यात याला चोपून काढल्याचा व्हिडिओ देखील शेअर करावा अशी विनंतीही लोक करत आहेत.
Pakda gya 🐒 (Police Caught a guy who was trying to break the Door of train) pic.twitter.com/NPGHMUXxc6
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 16, 2025
अनेक व्हिडिओ झाले आहेत व्हयरल -
खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांमध्ये लोक रागाच्या भरात गाड्यांच्या काचा आणि खिडक्या फोडाना दिसत आहेत. काही व्हिडिओंमध्ये लोक ट्रेनमधील लोकांना आरेरावी करताना दिसत आहेत. दरम्यान, नवी दिल्लीतील घटनाही घडली. अशा अनेक व्हिडिओंमुळे सरकार आणि प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.