तुमचीही फसवणूक होऊ शकते! प्रवाशाने 500 रुपयांची नोट दिली, रेल्वे कर्मचाऱ्याने 20 च्या नोटेत बदलली; Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 07:02 PM2022-11-29T19:02:50+5:302022-11-29T19:03:55+5:30
सध्याच युग हे डिजिटल युग आहे, रेल्वे तिकिटही ऑनलाईन सुरू झाली आहेत. पण तरीही मोठ्या संख्येने लोक काउंटरवरूनच तिकीट खरेदी करतात.
सध्याच युग हे डिजिटल युग आहे, रेल्वे तिकिटही ऑनलाईन सुरू झाली आहेत. पण तरीही मोठ्या संख्येने लोक काउंटरवरूनच तिकीट खरेदी करतात. पण, यावेळी तिकीट काउंटरच्या व्यक्तीकडून सुट्टी घेण्यासही विसरतात. अशाच एका घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे प्रकरण दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाचे, जिथे एका प्रवाशाने तिकीट खरेदी करताना रेल्वे कर्मचाऱ्याचे कृत्य कॅमेऱ्यात कैद केले, जे पाहिल्यानंतर तुम्हीही काउंटरवरून तिकीट खरेदी करताना अधिक सावध व्हाल.
हा व्हिडिओ शुट करणारी व्यक्ती तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्याला 500 रुपयांची नोट देते. पण जेव्हा कर्मचारी हुशारीने 500 रुपयांची नोट 20 रुपयांमध्ये बदलतो तेव्हा त्याची हुशारी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Train Girl on track Viral Video: ट्रेन आली तरी मुलगी ट्रॅकवर बसून बोलतच बसली, पुढे जे घडलं ते...
हा व्हिडिओ 25 नोव्हेंबर रोजी ट्विटर हँडल Rail Whispers ने शेअर केला आहे. हा व्हिडिओ 22 नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले आहे. निजामुद्दीन स्टेशन बुकिंग ऑफिसचा असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओत बुकिंग क्लार्कने 500 रुपयांची नोट 20 रुपयांच्या नोटेत बदलली असल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाख 37 हजारांहून अधिक व्ह्यूज, सुमारे चार हजार लाइक्स आणि सुमारे 2 हजार रिट्विट्स आले आहेत. यावर यूजर्स सतत प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची विनंती केली, तर काहींनी लिहिले की, प्रवाशाने व्हिडीओ बनवला हे चांगले झाले, अन्यथा त्यांची फसवणूक झाली असती.
#Nizamuddin station booking office
Date 22.11.22
Rs 500 converted into Rs 20 by the booking clerk.@GM_NRly@RailwayNorthern@drm_dli@RailMinIndia@AshwiniVaishnaw@IR_CRB@RailSamachar@VijaiShanker5@PRYJ_Bureau@kkgauba@tnmishra111@AmitJaitly5pic.twitter.com/SH1xFOacxf— RAILWHISPERS (@Railwhispers) November 24, 2022
एक प्रवासी सुपरफास्ट ग्वाल्हेर ट्रेनचे तिकीट काढतो. यावेळी तो रेल्वे कर्मचाऱ्याला 500 रुपयांची नोट देतो तेव्हा तो कर्मचारी हुशारीने 20 रुपयांची नोट बदलून देतो, असे या 15 सेकंदांच्या क्लिपमध्ये दिसत आहे. प्रवाशाचे लक्ष वळवण्यासाठी तो त्याला दोनदा ट्रेनचे नाव विचारतो. 125 रुपयांचे तिकीट काढण्यासाठी तो त्या व्यक्तीकडून अधिक पैशांची मागणी करतो.
दरम्यान हा व्हि़डिओ ट्विटरवर रेल्वेला टॅग करुन शेअकर करण्यात आला आहे. यात रेल्वे अधिकाऱ्यांनी रिप्लाय दिला आहे. या पोस्टला उत्तर देताना संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.'