Video : लॉकडाऊनमुळे वैतागलेली बाई; रस्त्यावर दिसला कोरोना मग काय, चोप चोप चोपला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:32 PM2020-04-21T16:32:11+5:302020-04-21T16:34:11+5:30

या व्हिडीओतून लॉकडाऊनमुळे या महिलेचा झालेला संताप दिसून येत आहे.

Viral video rajasthan angry woman beating chappal to corona during covid 19 lockdown myb | Video : लॉकडाऊनमुळे वैतागलेली बाई; रस्त्यावर दिसला कोरोना मग काय, चोप चोप चोपला...

Video : लॉकडाऊनमुळे वैतागलेली बाई; रस्त्यावर दिसला कोरोना मग काय, चोप चोप चोपला...

googlenewsNext

कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे काही लोक खूप कंटाळले आहेत. तर काहीजण टिकटॉकवर व्हिडीओ तयार करून लॉकडाऊन इन्जॉय करत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 

या व्हिडीओमध्ये लॉकडाऊनला कंटाळलेल्या बाईने रागात कोरोनालाच मारलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. एका महिलेने रागात रस्त्यावर दिसत असलेल्या कोरोनाला आपल्या चपलेने मारलं आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील बालोतरा मधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोरोना व्हायरसचा लोगो रस्त्यावर काढला आहे. तसंच कोरोनाला हरवायचं आहे अशा आशयाचा मजकूर लिहला आहे.

@sroyal2219

Corona ko padi chappal ##arielsharetheload##gharbaithoindia##tiktokindia_##rajasthan##marwadi

♬ original sound  - Kamal Bishnoi

या महिलेने कोरोनाचा लोगो पाहताच आपली चप्पल काढून रस्त्यावर जोर जोरात मारली आहे. हे पाहून तिथले लोक जोरजोरात हसायला लागले. हा व्हिडीओ टिम राजस्थान यांनी  टिकटॉकवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कोरोना चपलेने मार खातोय असं कॅप्शन देण्यात आलं आहे. ( हे पण वाचा- बापरे! विहीरीत अकडलेल्या बिबट्याला काढण्यासाठी केली 'अशी' आयडीया, बघा व्हायरल व्हिडीओ)

या व्हिडीओला ८ लाखापेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. तसंच ५०हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि २०० कमेंट्स आहेत. या व्हिडीओतून लॉकडाऊनमुळे या महिलेचा झालेला संताप दिसून येत आहे. ( हे पण वाचा-#quarantinepillowchallenge : कपड्यांऐवजी मुलींनी अंगावर फक्त बांधली उशी, फोटो पाहून म्हणाल, ही फॅशन अशी गं कशी?)

Web Title: Viral video rajasthan angry woman beating chappal to corona during covid 19 lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.