Video : धक्का मार यार! चक्क मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर सुरू होण्यासाठी मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 07:03 PM2021-04-02T19:03:12+5:302021-04-02T19:07:33+5:30
Trending Viral Video : हेलिपॅड रिकामा करण्यासाठी काही लोकांनी हे हेलिकॉप्टर धक्का मारुन दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांना हसू अनावर होत आहे.
देशातील विविध राज्यात निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. सध्या आसाममध्येही निवडणूकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यादरम्यान अनेक राजकीय नेते प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत आहेत. नेते मंडळी जरा लांबचा प्रवास म्हटलं की लगेच हेलिकॉप्टरनं जायचा मार्ग निवडतात. महामार्गावर गाडीचा प्रॉब्लेम झाल्यास, ट्रॅफिक असल्यास वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. तसंच हेलिकॉप्टरनं जाताना पण काही समस्यांचा सामना करावा लागतो. तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास नक्की बसेल.
असम के मुख्यमंत्री के हेलिकॉप्टर को किसी और वीआईपी के हेलिकॉप्टर की लैंडिंग के लिए धक्का मार कर हटाया गया । चुनाव के बाद ऐसी स्थिति कुर्सी को लेकर बनने की संभावना भी असम में दिख रही है । pic.twitter.com/sfy2lP2qKD
— Kumar Gaurav (@journogauravv) April 2, 2021
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये चार, पाच जण एका हेलिकॉप्टरला धक्का मारत आहेत. यापूर्वी कधीही असा विचित्र प्रकार लोकांनी पाहिलं नाही, त्यामुळे हेलिकॉप्टरला धक्का दिल्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हे हेलिकॉप्टर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांचं असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर
हे हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवर उतरवण्यात आलं होतं. त्याठिकाणी दुसऱ्या एका महत्त्वाच्या नेत्याचं हेलिकॉप्टर उतरवलं जाणार होतं. त्यामुळे हेलिपॅड रिकामा करण्यासाठी काही लोकांनी हे हेलिकॉप्टर धक्का मारुन दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांना हसू अनावर होत आहे.
काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS म्हणाले....
कुमार गौरव नावाच्या एका ट्विटर युजरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या ट्विटला कॅप्शन दिलं आहे की, 'दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचं हेलिकॉप्टर खाली उतरवण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर काही लोकांनी धक्का देवून हटवलं आहे.' निवडणूकीनंतर खुर्चीसाठी अशाच प्रकारचं चित्र दिसण्याची संभाव्यता आहे.' यावर अनेक लोकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे.