Video : ५३व्या मजल्यावर होता स्वीमिंग पूल, भूकंप आला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 02:34 PM2019-04-24T14:34:13+5:302019-04-24T14:36:24+5:30
सोशल मीडियात सतत आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि त्यावरुन चर्चाही होत असते.
सोशल मीडियात सतत आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि त्यावरुन चर्चाही होत असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. फिलिपिंसमध्ये २२ एप्रिलला भूकंप आला होता. यात १६ पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला.
६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. बिल्डींगच्या टॉपवर एक स्वीमिंग पूल होता. पण भूकंपाच्या धक्क्यामुळे या स्वीमिंग पूलमधील पाणी खाली पडताना दिसत आहे. हे दृश्य असं वाटतं जशी ढगफूटी झालीये.
हा व्हिडीओ फिलिपिंसची राजधानी मनीलाचा आहे. इथे एक Anchor Skysuites ही ५३ मजल्यांची इमारत आहे. या बिल्डींगच्या टॉप फ्लोरवर स्वीमिंग पूल होता. भूकंप येताच पाणी वरुन खाली पडू लागलं होतं.
पाणी ५३व्या मजल्यावरुन खाली पडत होतं. त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांनी लोकांना अलर्ट केलं. तेव्हा इमारतही रिकामी करण्यात आली होती.