Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 10:45 AM2024-09-29T10:45:06+5:302024-09-29T10:46:52+5:30

सोशल मीडियात एका यूट्युबरनं कॅनडात राहणाऱ्या भारतीयांनी संवाद साधला. त्यात त्यांच्या राहणीमानावर भाष्य करण्यात आलं आहे. 

Viral Video: Salary 60 lakhs but difficult to live; Indians don't have enough money in Canada, why? | Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?

Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?

नवी दिल्ली - प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने युवा नोकरीसाठी परदेशात जातात. त्यातील बहुतांश भारतीय कॅनडा, न्यूयॉर्क, ऑस्ट्रेलिया, ओमान, जपानसारख्या देशांचा मार्ग पत्करतात. कॅनडात शिक्षण आणि नोकरी दोन्हीही दृष्टीने युवकांची पहिली पसंती असते परंतु भारतीयांना तिथं जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अलीकडेच मूळ भारतीय असलेल्या एका महिलेने ६० लाख पगार असूनही कॅनडात कशारितीने घर चालवावं लागतं त्यातून मासिक बजेट कोलमडतं याची व्यथा मांडली आहे.

विशेषत: भारतात ६०-७० लाख वार्षिक पगार ऐकून कुणीही खुश होईल. लोक कौतुक करतील. लाईफ असावी तर अशी...असं म्हणतील मात्र कॅनडात तसं नाही. त्याठिकाणी महागाई इतकी वाढली आहे ज्यामुळे ६० लाख वार्षिक पगारही कमी पडतो. मूळ भारतीय असलेली ही महिला सध्या कॅनडात एका बॅकेंत नोकरी करते. कॅनडात राहणाऱ्या ६० लाख पगारही पुरेसा नाही असं तिने सांगितले.

व्हायरल व्हिडिओत दिसणारी ही महिला कॅनडातील टीडी बँकेत एक टेक्निशियन म्हणून काम करते. तिला १० वर्षाचा कामाचा अनुभव आहे. हा व्हिडिओ पीयूष मोंगा नावाच्या व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलाय. त्यात ही मुलगी पीयूषला सांगते की, ती वर्षाला ९५ हजार डॉलर म्हणजे ६० लाख रुपये कमावते परंतु इतक्या पगारात ती खुश नाही. कॅनडात राहणे खूप महाग झालं आहे. 


ही महिला मागील ३ वर्षापासून कॅनडात राहते. ती जेव्हा इथं राहायला आली तेव्हा त्या वेळी बटरचा दर फक्त चार डॉलर होता परंतु आता तेच बटर मार्केटमध्ये जवळपास ८ डॉलरला मिळते. कॅनडात चांगल्यारितीने जीवन जगण्यासाठी खूप पैशांची गरज भासते. तिने कॅनडा आणि भारतातील महागाईची तुलना केली तेव्हा कॅनडात भारताच्या तुलनेने महागाई प्रचंड असून ती सातत्याने वाढत आहे असं महिलेने सांगितले.

२ बीएचके घराचं भाडं १ लाख

ही महिला कॅनडातील टोरंटो शहरात राहते. तिथे २ बेडरुम, २ बाथरुम असणाऱ्या घरासाठी ती महिन्याला १६०० डॉलर म्हणजे जवळपास १ लाख ३४ हजार रुपये भाडे भरते. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत २० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यात अनेकजण महिलेला भारतात परतण्याचा सल्ला देत आहेत. 
 

Web Title: Viral Video: Salary 60 lakhs but difficult to live; Indians don't have enough money in Canada, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.