मर्सिडीजच्या मदतीला धावून आला रिक्षावाला! पेट्रोल संपले, ऑटो चालकाने दिला धक्का, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 04:20 PM2022-12-16T16:20:22+5:302022-12-16T16:24:08+5:30
प्रवासात आपल्या बाईकचे पेट्रोल संपले तर बाईक ढकलणे हा सर्वात वाईट अनुभव आहे. शेवटच्या क्षणी देवदूत बनून तुमची बाईक किंवा कार पुढे ढकलण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी ऑटोचालक आणि दुचाकीस्वार येतात.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी ट्राफिकमुळे मर्सिडीजचे सीईओ रिक्षातून गेल्याचे व्हायरल झाले होते, सध्या असाच एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक रिक्षाचलक चक्क मर्सिडीजला धक्का देत असल्याचे दिसत आहे.
प्रवासात आपल्या बाईकचे पेट्रोल संपले तर बाईक ढकलणे हा सर्वात वाईट अनुभव आहे. शेवटच्या क्षणी देवदूत बनून तुमची गाडी पुढे ढकलण्यात तुम्हाला मदत करणाऱ्या ऑटोचालक आणि दुचाकीस्वारांसाठी ते चांगलेच असावे. रिक्षाचालक इतरांच्या कारला पायाने कसे ढकलतात हे तुम्ही पाहिलेच असेल. पण तुम्ही कोणत्याही आलिशान कारला असे ढकललेले पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
KP ❤️🤣
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) December 15, 2022
संकटकाळी मदतीला येणारा एक रिक्षावाला मित्र पाहिजेच...💪🏼 pic.twitter.com/qRpcm2F8RX
हा व्हिडिओ पुण्यातील आहे. या व्हिडिओमध्ये कोरेगाव पार्क हे ठिकाण दिसत आहे. हा 10 सेकंदाचा व्हिडिओत आलिशान कारलाही धक्क्याची गरज आहे का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.यात रेड कलरची मर्सिडीज रस्त्यावरून धावत आहे, मात्र एका ऑटोचालकाने तिला मागून धक्का दिले आहे. महागड्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं. त्यानंतर एका ऑटो चालकाने कार मालकाला मदत केली. दोघांच्या मागे धावत असलेल्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @PuneriSpeaks नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल झाला आहे.