Video: मेट्रोनं मुलाला थेट घरी सोडलं, भविष्यातील घरं अशी असतील का? हे तंत्रज्ञान एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 02:12 PM2022-12-04T14:12:54+5:302022-12-04T14:14:28+5:30

आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे. जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की विज्ञानानं आपल्याला खूप ...

viral video shows metro train drops kid directly in future home | Video: मेट्रोनं मुलाला थेट घरी सोडलं, भविष्यातील घरं अशी असतील का? हे तंत्रज्ञान एकदा पाहाच...

Video: मेट्रोनं मुलाला थेट घरी सोडलं, भविष्यातील घरं अशी असतील का? हे तंत्रज्ञान एकदा पाहाच...

googlenewsNext

आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे. जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की विज्ञानानं आपल्याला खूप काही दिलं आहे. आजवर जे जे काही शोध लागले आहेत काही चमत्कारापेक्षा कमी नाहीत. भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेत माणूस आता काही तासांत पोहोचू शकतो हा विज्ञानाचा चमत्कार आहे. ही विज्ञानाची देणगी आहे, ज्यामुळे आज मंगळावर माणूस पोहोचला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे की जो भविष्यात घरं कशी असतील हे सांगत आहे. ट्विटरवर शेअर होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खूश व्हाल. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला सोफ्यावर बसून मोबाईल हाताळण्यात व्यस्त आहे. इतक्यात जमीन सरकते आणि खालून मेट्रो ट्रेन येताना दिसते. घराखालून धावणारी मेट्रो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पण त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेट्रोतून सिलेंडरच्या आकाराचा एक डबा बाहेर येतो. तो एका लिफ्ट प्रमाणे घरात उघडतो आणि त्यातून एक चिमुकला मुलगा बाहेर येतो. सध्या मेट्रो पकडण्यासाठी स्टेशनवर जावं लागतं, पण हा व्हिडिओ पाहून असं वाटतंय की येत्या काळात लोक मेट्रोतून थेट आपापल्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था होईल. हे अशक्यप्राय वाटत असलं तरी तितकंच रोमांचक देखील आहे.

जरी त्याची रचना ग्राफिक पद्धतीनं केली गेली असली, तरी लोक ज्या पद्धतीनं भविष्याचा विचार करत आहेत, त्यामुळे भविष्यात असं काही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. चीनमध्ये एक रेल्वे ट्रॅक देखील आहे जो निवासी इमारतीतून जातो. हा ट्रॅक चोंगकिंगमधील एका इमारतीतून जातो, ज्याला माउंट सिटी असेही म्हणतात. त्यामुळे भविष्यात काहीही शक्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Web Title: viral video shows metro train drops kid directly in future home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.