VIDEO : खतरनाक! मंदिरात झोपलेल्या तरूणाच्या अंथरूणात शिरला साप आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 03:25 PM2021-09-08T15:25:41+5:302021-09-08T15:25:54+5:30
राजस्थानच्या बांसवाडा भागातील एका महादेवाच्या मंदिरात एक तरूण खाली झोपला होता. साधारण अर्ध्या रात्री एक कोब्रा साप त्याच्या चादरीत शिरला.
अलिकडे साप कुठेही निघतात. कारण लोक जंगल तोडून आपली घरे बनवत आहेत. पावसाळ्यात तर साप शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर येतात. सापाच्या दंशाने लोक मरण पावल्याच्याही अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली असून ज्यात एक पुरूष सापापासून थोडक्यात बचावला. मंदिरात झोपलेल्या पुरूषाच्या पांघरुणात कोब्रा नाग शिरला होता. पुढे काय झालं ते व्हिडीओत बघा.
राजस्थानच्या बांसवाडा भागातील एका महादेवाच्या मंदिरात एक तरूण खाली झोपला होता. साधारण अर्ध्या रात्री एक कोब्रा साप त्याच्या चादरीत शिरला. तरूण गाढ झोपेत असल्याने त्याला आधी काही लक्षात आले नाही. पण जेव्हा त्याला अंथरूणात काहीतरी शिरल्याची जाणीव झाली तो खळबळून उठला. (हे पण वाचा : शेपटीवरून सापाच्या ताकदीचा अंदाज बांधू नका, नाहीतर....!; थरकाप उडवणारा Video)
हा तरुण दररोज शंकराच्या मंदिरात झोपतो. या भागात बिबट्यांची आणि कोब्रा नागांची मोठी दहशत असते. कोणत्याही वेळी कुठलाही प्राणी हल्ला करण्याची शक्यता असते. नेहमीप्रमाणे हा तरुण गाढ झोपेत असताना एक कोब्रा त्याच्या पांघरूणात शिरला.
त्यानंतर काही वेळाने त्याला अंथरूणात काहीतरी शिरल्याचं जाणवलं तर त्याने पायाने त्याला सरकवलं. पण तो साप काही तेथून केला नाही. त्यानंतर तो झोपेतून खाडकन उठला. तो अंथरूणापासून बाजूला गेला. त्याचवेळी कोब्राने हवेत उडून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण काही अंतरावर उभा असल्याने या हल्ल्यातून बचावला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडत आहे.