भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 01:26 PM2020-06-18T13:26:10+5:302020-06-18T13:27:02+5:30
गायक मोहम्मद रफी यांच्या 'ढल गया दिन' या गाण्यावर पोलीस अधिकारी प्रशिक्षण देत आहे.
पोलीस प्रशिक्षण घेताना शिस्त किती महत्त्वाची आहे, हे वेगळं सांगायला नको. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्षात किंवा चित्रपटात पोलीस प्रशिक्षणाची शिस्त पाहिली असेल. पण, आज आपण असा व्हिडीओ पाहणार आहोत. ज्यात लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांचं गाणं गाऊन प्रशिक्षण दिलं जात आहे. तेलंगणा पोलीस प्रशिक्षकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही, परंतु त्याचबरोबर त्या पोलिसाचे कौतुक केल्या वाचूनही करमणार नाही.
तेलंगणा पोलीस येथील सहाय्यक पोलीस अधिकारीचा हा व्हिडीओ आहे. विद्यार्थ्यांना अगदी वेगळ्या पद्धतीनं तो प्रशिक्षण देताना पाहायला मिळत आहे. या पोलीस अधिकाऱ्याचं नाव मोहम्मद रफी आहे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची त्याची स्टाईल व्हायरल होत आहे. गायक मोहम्मद रफी यांच्या 'ढल गया दिन' या गाण्यावर पोलीस अधिकारी प्रशिक्षण देत आहे.
41 वर्षीय रफी यांनी सांगितले की,''2007पासून मी ट्रेनिंग देत आहे. पहाटे 4.30 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ नये म्हणून गाणं गात सराव दिला जातो.'' 1998मध्ये रफी यांनी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला सुरुवात केली आणि 2006मध्ये त्यांना हेड कॉन्स्टेबल म्हणून बढती मिळाली. 2018मध्ये ते सब इन्स्पेक्टर झाले. त्यांचे आजोबा ब्रिटीश राजमध्ये पोलीस अधिकारी होते.
पाहा व्हिडीओ...
Hats Off to this Drill Instructor ..👍👍🙏 pic.twitter.com/Uzh5rD3Rmy
— Anil Kumar IPS (@AddlCPTrHyd) June 14, 2020
Interesting #Telangana Police Drill Instructor pic.twitter.com/upjhQA36i2
— Nellutla Kavitha (@iamKavithaRao) June 14, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Big News : सात वर्षांच्या बंदीनंतर एस श्रीसंतचे संघात पुनरागमन होणार
कोरोना पॉझिटिव्ह शाहिद आफ्रिदीचा नवा व्हिडीओ व्हायरल; म्हणतो, 'त्या' सर्व अफवा!
निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!
शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम
कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार!
पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली बनला 'स्ट्रीट डान्सर'; Video Viral