अरे बापरे! लग्नात मागितली गाडी, नवरदेवाची चपलेने केली धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:27 AM2023-05-10T10:27:26+5:302023-05-10T10:30:26+5:30

हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

viral video The bike asked for in marriage, the bridegroom's shoes were washed | अरे बापरे! लग्नात मागितली गाडी, नवरदेवाची चपलेने केली धुलाई

अरे बापरे! लग्नात मागितली गाडी, नवरदेवाची चपलेने केली धुलाई

googlenewsNext

हुंडा प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कडक कायदे केले आहेत. हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरीही हुंडा घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. एका लग्नात हुंडा म्हणून मोटारसायकल मागणाऱ्या वराची सासरच्यांनी चपलेने धुलाई केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गर्लफ्रेंडच्या घरात घुसून राडा घातला; कोर्टाची शिक्षा ऐकून बॉयफ्रेंड नाचू लागला

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वर लग्नासाठी तयार असल्याचे दिसते. त्याच्यासोबत वधूही दिसत आहे. मात्र, लग्न चालू असताना नवरदेवाने हुंड्यात मोटारसायकलची मागणी केल्यावर सासरचे लोक संतापले आणि त्याला चपलेने मारहाण करू लागले. सासरे वराला पोलिस स्टेशनला  घेऊन जाण्याची धमकी देतात. सरतेशेवटी वर आपल्या चुकीबद्दल माफी मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे, हे समोर आलेले नाही.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, हुंडा मागणाऱ्या अशा लोकांना आपली मुलगी कधीही देऊ नये. अशा लोकांना तुमची मुलगी देऊन तुम्ही तिला मरणाच्या खाईत ढकलत आहात. आणखी एका यूजरने लिहिले की, जवळपास सर्वच वडिलांनी हे काम केले पाहिजे, आजच्या काळात हुंडा हा एक शाप आहे. गौरव नावाच्या यूजरने लिहिले की, मुलगी चांगली असावी, बाइकमध्ये काय ठेवले आहे.

Web Title: viral video The bike asked for in marriage, the bridegroom's shoes were washed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.