सिंह आहे तो सिंह! जंगलाच्या राजाला म्हशीसारखे हाकलले; वनरक्षकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:59 IST2025-01-08T18:58:24+5:302025-01-08T18:59:09+5:30

गुजरातच्या जंगलातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमध्ये एक वनरक्षक रेल्वेच्या पटरीवरुन सिंहाला म्हशीसारखे बाजूला हाकलत आहे.

viral video The king of the jungle lion was chased away like a buffalo; The video of the forest guard is going viral | सिंह आहे तो सिंह! जंगलाच्या राजाला म्हशीसारखे हाकलले; वनरक्षकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सिंह आहे तो सिंह! जंगलाच्या राजाला म्हशीसारखे हाकलले; वनरक्षकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सिंह हा जंगलाचा राजा असतो. सिंहाची डरकाळी जरी ऐकली तरी आपल्याला भीती वाटते. गुजरातच्या भावनगर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वनरक्षक रेल्वेच्या पटरीवरुन सिंहाला म्हशीसारखे हाकलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ भावनगर डिव्हीजन अंतर्गत येणाऱ्या लिलिया स्टेशन जवळचा असणाऱ्या क्रॉसिंग गेटचा  आहे.  

काँग्रेसला ममता बॅनर्जींनी दिला धक्का! अरविंद केजरीवाल म्हणाले, 'थँक यू दीदी' 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक सिंह रेल्वे पटरीवर बसलेला असल्याचे दिसत आहे. यावेळी वरक्षकाने त्या सिंहाला न घाबरता काठीने पाठलाग केला. भावनगर रेल्वे विभागांतर्गत बहुतांश भागात सिंह दिसतात. सिंह रेल्वे गेटजवळ ट्रॅक ओलांडत होता. याआधीही अनेकदा असे व्हिडीओ समोर आले आहेत.

सोमवारी दुपारी ३ वाजता दामनगरजवळील लिलीया स्टेशनच्या एलसी-३१ गेटवर वनरक्षक ड्युटीवर तैनात असताना सिंह रुळावर आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी रेल्वे कर्मचारी आणि सिंहाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. सोशल मीडियावर युजर्स कर्मचाऱ्याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. या भागात सिंह अनेकदा ट्रॅकवर येतात. रेल्वेने आधीच काही प्रकरणांची पुष्टी केली आहे. गुजरातमध्ये सध्या थंडी जास्त आहे. यामुळे वनविभागाने ग्रामीण भागात सिंहांच्या संरक्षणाचे आदेश जारी केले आहेत. सिंहांच्या सुरक्षेसाठी कर्मचारीही सज्ज आहेत.

या आधीही सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यात गीरचा एक व्हिडीओ होता, यामध्ये रात्री पेट्रोल पंपाजवळ १०-१२ सिंहांचा कळप दिसला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका कार चालकाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. गीर हे आशियाई सिंहांचे एकमेव अधिवास मानले जाते. येथे अनेक सिंह आहेत, हे सिंह अनेकदा लोकवस्तीच्या भागात येतात. परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या ठिकाणी लोक रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडत नाहीत.

Web Title: viral video The king of the jungle lion was chased away like a buffalo; The video of the forest guard is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.