ना चावी ना कोणतं हत्यार चोराने काही सेकंदात स्टार्ट केली रॉयल एनफील्ड, बघून पोलिसही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:37 AM2022-03-14T11:37:15+5:302022-03-14T11:41:26+5:30

Viral Video :  सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघितल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. पोलिसांनी एका बुलेट चोरी करणाऱ्या चोराला अटक केली आहे.

Viral Video : Thief start the royal enfield bullet without key police surprise | ना चावी ना कोणतं हत्यार चोराने काही सेकंदात स्टार्ट केली रॉयल एनफील्ड, बघून पोलिसही झाले हैराण

ना चावी ना कोणतं हत्यार चोराने काही सेकंदात स्टार्ट केली रॉयल एनफील्ड, बघून पोलिसही झाले हैराण

Next

Viral Video : भारतात बऱ्याच लोकांकडे रॉयन इनफील्ड बुलेट गाडी आहे. ही गाडी असणं म्हणजे एक स्टेटस झालं आहे. गाडी शानदार दिसत असल्याने चोरांचीही या गाडीवर नजर असते. अलिकडे कोणती ना कोणती अशी बातमी समोर येत असते की, चोर काही मिनिटांमध्ये बुलेट चोरी करून पळून जातात आणि त्यांना कुणीही पकडू शकत नाही. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघितल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. पोलिसांनी एका बुलेट चोरी करणाऱ्या चोराला अटक केली आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, पोलिसांनी बुलेट चोरी करणाऱ्या एका तरूणाला पकडलं आहे आणि तो कशाप्रकारे बुलेट चोरी करतो याचं प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगण्यात आलं. बाजूलाच हॅंडल लॉक असलेली एक बुलेट उभी होती आणि त्याने काही सेकंदात लॉक तोडलं. तो गाडी चावी नसतानाही सुरू करताना दिसत आहे. बुलेटच्या हॅंडलजवळील काही वायर जोडून तो गाडी सुरू करतो. हे बघून पोलिसही हैराण होतात. 

चोराने काही मिनिटांच्या आत चावी नसतानाही गाडीचं लॉक तोडलं आणि गाडी सुरूही केली. यानंतर लोक बोलून लागले की त्याला गाडीचं लॉक तोडायला आणि गाडी सुरू करायला एक मिनिटही लागला नाही. म्हणजे चोरासाठी बुलेट चोरी करणं काही मोठी गोष्ट नाही. जर तुम्हालाही गाडीची सिक्युरिटी वाढवायची असेल तर आणखी लक्ष द्यायला हवं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ memewalanews नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
 

Web Title: Viral Video : Thief start the royal enfield bullet without key police surprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.