VIDEO : वाघ आणि अस्वलाचा झाला आमना-सामना, पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 09:48 AM2021-10-15T09:48:42+5:302021-10-15T09:50:44+5:30

Social Viral Video : अस्वलाला दोन पायांवर उभा झालेला पाहून वाघाची भंबेरी उडते आणि तो खाली बसतो. तर अस्वल तिथे असलेल्या लोकांना पाहून तेथून पळ काढतो. 

Viral Video : Tiger Vs sloth bear close encounter shocking video shared by ifs officer | VIDEO : वाघ आणि अस्वलाचा झाला आमना-सामना, पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही!

VIDEO : वाघ आणि अस्वलाचा झाला आमना-सामना, पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही!

googlenewsNext

Social Viral Video : अस्वल आणि वाघाच्या फाइटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. पण ताजा व्हिडीओ असा आहे जो बघून लोकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. यात एक स्लॉथ बेअर आणि वाघ आमनेसामने येतात. पण आश्चर्याची बाब दोघेही एकमेकांना जराही स्पर्श करत नाहीत. अस्वलाला दोन पायांवर उभा झालेला पाहून वाघाची भंबेरी उडते आणि तो खाली बसतो. तर अस्वल तिथे असलेल्या लोकांना पाहून तेथून पळ काढतो. 

हा व्हायरल झालेला व्हिडीओ १ मिनिट १६ सेकंदाचा आहे. ज्यात एक वाघ गपचूप आपल्या रस्त्याने जात असतो. तर तेथील पर्यटक त्याचा व्हिडीओ काढत आहेत. तेव्हाच अचानक एक अस्वल वाघाच्या मागून येतो. हे वाघाच्या लक्षात येतं. दोघांचा आमना-सामना होतो आणि अस्वल अचानक दोन्ही पायांवर उभा होतो. 

अस्वलाला अटॅक पोजिशनमध्ये पाहून वाघ जमिनीवर बसतो आणि शेपटी हलवू लागतो. वाघ अजिबात आक्रामक होत नाही, तो आरामात शांतपणे खाली बसतो. अशात अस्वल आजूबाजूला बघतो. तेव्हा त्याची नजर लोकांवर पडते. मग तो धावत जंगलाकडे जातो. तर वाघ बराच वेळ तिथेच बसून राहतो.

हा व्हिडीओ १४ ऑक्टोबरला भारतीय वन सेवा अधिकारी संदीप त्रिपाठी यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला काही हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. लोक अस्वलाचा आणि वाघाचा असा व्हिडीओ बघून हैराण झाले आहेत.
 

Web Title: Viral Video : Tiger Vs sloth bear close encounter shocking video shared by ifs officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.