वाघिणीने जन्म देऊन सोडले, आता कुत्रा करतोय तिच्या बछड्यांचा सांभाळ; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:41 PM2022-05-16T12:41:23+5:302022-05-16T12:43:20+5:30
Labrador Dog And Tiger Cub Viral Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसतं की, एका दुसऱ्या प्राण्याचे बछडे दुसराच प्राणी सांभाळत आहे. एक लेब्राडोर डॉगी वाघिणीच्या बछड्यांचा सांभाळ करत आहे.
Labrador Dog And Tiger Cub Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे हजारो व्हिडीओ आहे. पण यातील काही व्हिडीओ असे असतात जे मनाल भिडतात. असाच एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा व्हिडीओ बघून तुम्ही अवाक् व्हाल. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, एखाद्या बाळाला त्याची आई सोडून जाते तेव्हा त्याचा सांभाळ दुसरंच कुणीतरी करतं. हे अनेक सिनेमातही बघायला मिळतं. पण व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसतं की, एका दुसऱ्या प्राण्याचे बछडे दुसराच प्राणी सांभाळत आहे. एक लेब्राडोर डॉगी वाघिणीच्या बछड्यांचा सांभाळ करत आहे.
हा व्हिडीओ चीनचा आहे. वाघिणी आपल्या तीन बछड्यांना सोडून गेली. ज्यानंतर एक लेब्राडोर डॉगी त्यांचा सांभाळ करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरील लोकांना खूपच आवडला आहे. अनेकांना या व्हिडीओने इमोशनल केलंय. व्हिडीओत वाघिणीच्या तीन बछड्यांना तुम्ही डॉगीसोबत खेळताना बघू शकता. सांगितलं जात आहे की, वाघिणीने बछड्यांना जन्म दिल्यावर लगेच दूध पाजण्यास नकार दिला होता.
Because you want to see a lab doggy take care of baby rescue tigers
— A Piece of Nature (@apieceofnature) May 15, 2022
pic.twitter.com/qmKnyO4Fzi
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्राकारे एक लेब्राडोर डॉगी बसलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला वाघाचे तीन बछडे मस्ती करत आहेत. तीनही बछडे डॉगीच्या अंगावर खेळत आहेत. प्राण्यांनी आपल्या पिल्लांना जन्म दिल्यावर लगेच सोडणं हे काही नवीन नाही. सामान्यपणे प्राणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिल्लांना जन्म देतात. पण त्यांचा सांभाळ करू शकत नाही. तेव्हा ते त्यांना सोडतात.