Viral Video :कायच्या काय! चक्क ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे, व्हिडीओ पाहून लोटपोट होऊन हसू लागले लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:01 PM2020-08-26T14:01:29+5:302020-08-26T14:07:58+5:30
सध्या ट्रॅक्टरचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा जुगाडाचा नाहीये. यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याचे बघायला मिळते. हा पाहून लोक हसून लोटपोट झाले आहेत.
सोशल मीडियावर ट्रॅक्टरच्या वेगवेगळ्या कारनाम्यांचे कित्येक व्हिडीओ आहेत. कुणी ट्रॅक्टरच्या मदतीने म्हशीचं दूध काढतं तर कुणी ट्रॅक्टरला जेसीबी मशीन बनवतं. इतकेच काय तर काही लोक ट्रॅक्टर दोन चाकांवरही पळवतात तर काही पाण्यातही. पण सध्या ट्रॅक्टरचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा जुगाडाचा नाहीये. यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याचे बघायला मिळते. हा पाहून लोक हसून लोटपोट झाले आहेत.
The dangers of over-parenting 😁 pic.twitter.com/vPDfOWXU34
— Pankaj Nain IPS (@ipspankajnain) August 26, 2020
हा व्हिडीओ @ipspankajnain नावाच्या यूजरने शेअर केलाय. याच्या कॅप्शनला त्याने लिहिले की, 'ओव्हर पॅरेंटींगचे धोके'. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये फारच वजन आहे. असं दिसतंय की, ट्रॅक्टर एका खड्ड्यात अडकलाय. ज्याला काढण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे. क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टरला दोर बांधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे करत असताना अचानक ट्रॅक्टरचे दोन तुकडेच होतात. आतापर्यंत या व्हिडीओला ५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ६०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
So now we have a new product opportunity—Amphibious tractors. Will be perfect when we start farming the Ocean beds! 😊 https://t.co/ZRVKB1OTFM
— anand mahindra (@anandmahindra) August 22, 2020
हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी शेअर केला होता. ते गमतीदारपणे म्हणाले होते की, आता आमच्याकडे नवीन प्रॉडक्ट, अॅम्बिसिअस ट्रॅक्टर तयार करण्याची संधी आहे. हे तेव्हा परफेक्ट काम होईल जेव्हा आपण समुद्रात शेती करणं सुरू करतील. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ३० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
हे पण बघा :
सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल
VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! अवघ्या काही अंतरावरून गेली सुस्साट गाडी अन् वाचला नशीबवान गडी
Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्...