'...तर दोन कानाखाली खाशील', आईसाठी ऑक्सिजन सिलेंडर मागणाऱ्याला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 07:58 PM2021-04-23T19:58:14+5:302021-04-23T20:04:55+5:30

Viral video of union minister : काळाबाजार, साठेबाजी,  निष्काळजीपणाच्या घटना व्हायरल होत असताना राज्यातील वातावरण काही अनुकूल नाही.

Viral video of union minister prahlad patel give rude answer to man who is demanding oxygen cylinder for mother |  '...तर दोन कानाखाली खाशील', आईसाठी ऑक्सिजन सिलेंडर मागणाऱ्याला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर

 '...तर दोन कानाखाली खाशील', आईसाठी ऑक्सिजन सिलेंडर मागणाऱ्याला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर

googlenewsNext

सध्याच्या स्थितीला कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण जगभरात चिंताजनक वातावरण तयार झालं आहे. जवळपास देशातील अनेक राज्यात ऑक्सिजन आणि रेमेसिविरचा तुटवडा भासत आहे. काळाबाजार, साठेबाजी,  निष्काळजीपणाच्या घटना व्हायरल होत असल्यामुळे राज्यातील वातावरण काही अनुकूल नाही. अशात आता भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असून यात ते गरजूंना मदत करण्याऐवजी नको तेच ऐकवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसणारे वरिष्ठ नेते आहेत दमोह लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल. ( Viral Video of Prahlad Patel) पटेल यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. केंद्रीय मंत्री बुधवारी दमोह जिल्हा रुग्णालयात पाहणीसाठी गेले होते. यावेळी हा प्रकार घडला. 

आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी

या घटनेनंतर व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक अत्यंत काळजीत असणारा व्यक्ती पटेल यांच्याकडे येऊन म्हणाला, आई आजारी आहे, तिला ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाहीये, एक तास झाला, मात्र अजूनही मिळाला नाही. यावर पटेल म्हणाले, आधी तुझी भाषा सुधार, असं बोलशील तर दोन कानाखाली खाशील.

कौतुकास्पद! १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही, कोरोनाच्या लाटेपासून भारतातल्या गावानं 'असा' केला बचाव

मंत्र्यांचं असं उत्तर ऐकून ऑक्सिजनची मागणी करणारा व्यक्ती म्हणाला, हो मी दोन खाईल, माझी आईदेखील खाण्यासाठी तिथे आहे, सांगा आम्ही काय करू? 36 तासांपासून प्रयत्न करत आहे. ऑक्सिजन सिलेंडर मिळाला तर तो केवळ पाच मिनिटे चालला. देऊ शकत नसाल, तर सरळ नाही म्हणून सांगा. या वादानंतर कसंबसं तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. 
 

Web Title: Viral video of union minister prahlad patel give rude answer to man who is demanding oxygen cylinder for mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.