Viral Video: बायडेन यांच्याकडून कमला हॅरिस यांचा 'फर्स्ट लेडी' म्हणून उल्लेख, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:00 PM2022-03-18T14:00:36+5:302022-03-18T14:02:37+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

viral video us president joe biden calls kamala harris as first lady by mistake netizens make jokes troll white house programe viral video social media | Viral Video: बायडेन यांच्याकडून कमला हॅरिस यांचा 'फर्स्ट लेडी' म्हणून उल्लेख, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Viral Video: बायडेन यांच्याकडून कमला हॅरिस यांचा 'फर्स्ट लेडी' म्हणून उल्लेख, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

googlenewsNext

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांना चुकून फर्स्ट लेडी म्हणताना दिसत आहेत. मात्र, बायडेन यांनी त्वरित आपली चूक सुधारली. पण काही ट्विटर युजर्सनी त्यांना यावरूनही ट्रोल केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला फर्स्ट लेडी असं संबोधलं जातं.

रिपोर्ट्सनुसार नुकतंच बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यादरम्यान, बोलताना त्यांनी अनावधानानं कमला हॅरिस यांचा उल्लेख फर्स्ट लेडी असा केला. फर्स्ट लेडी (कमला हॅरिस) यांच्या पतीला कोरोनाची लागण झाली आहे. यासाठी त्या कार्यक्रमात येऊ शकल्या नाही, असं बायडेन म्हणाले.

 



या नंतर आपण चुकल्याचं लक्षात येता त्यांनी हसत आपली पत्नी जिल यांच्याकडे पाहत आपण ठीक असल्याचं म्हटलं. "मी जिल बायडेन यांचा पतीन आहे आणि मला याचा अभिमान आहे," असंही ते म्हणाले. परंतु यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी त्यांनी शाळा घेतली.

Web Title: viral video us president joe biden calls kamala harris as first lady by mistake netizens make jokes troll white house programe viral video social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.