अचानक भर रस्त्यावर बिकीनी घालून पोल डान्स करू लागला व्यक्ती, व्हिडीओ पाहून लोक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 05:05 PM2021-09-24T17:05:51+5:302021-09-24T17:10:12+5:30

काही लोकांना इतर लोकांकडून अटेंशन मिळवण्याची फार सवय असते. अटेंशन मिळवण्यासाठी हे लोक काहीही करायला तयार होतात.

Viral video wearing bikini of girls this man started creating ruckus on the middle road | अचानक भर रस्त्यावर बिकीनी घालून पोल डान्स करू लागला व्यक्ती, व्हिडीओ पाहून लोक हैराण

अचानक भर रस्त्यावर बिकीनी घालून पोल डान्स करू लागला व्यक्ती, व्हिडीओ पाहून लोक हैराण

Next

नेहमीच तुम्ही रस्त्यावर  लोकांना चालता-फिरता किंवा एखाद्या दुकानदाराला काहीना काही विकताना बघितलं असेल. पण अनेकदा अशा काही गोष्टी बघायला मिळतात की, बघणारे बघतच राहतात. रस्त्यावर जर एखादी व्यक्ती विचित्र वागत असेल तर कुणालाही प्रश्न पडेल की, हा  आहे कोण आणि असं का करतोय? काही लोकांना इतर लोकांकडून अटेंशन मिळवण्याची फार सवय असते. अटेंशन मिळवण्यासाठी हे लोक काहीही करायला तयार होतात. असाच एक कारनामा समोर आला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात असंच काहीसं बघायला मिळतं. यात एक व्यक्ती अचानक रस्त्यावर येऊन पोल डान्स करू लागतो. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने बिकीनी घातलेली आहे. बिकीनी घालून तो पोलच्या चारही बाजूने फिरू लागतो. त्याचा हा कारनामा पाहून लोक त्याला बघू लागतात. इतकंच नाही तर त्याचा कारनामा कॅमेरात कैद करू लागतात.  (हे पण वाचा : ना ४ ना ५ ना १०....शोधा 'या' फोटोत किती प्राणी आहेत? भलेभले झाले शोधून हैराण....)

काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यक्तीने बिकीनी घालून लोकांना हैराण केलं. त्यानंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल व्हायला जराही वेळ लागला नाही. हा व्हिडीओ भारताबाहेरचा असल्याचं दिसतंय. सद्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ निरंजन महापात्रा नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाइक केलं. तसेच अनेक कमेंट्सही यावर येत आहेत.
 

Web Title: Viral video wearing bikini of girls this man started creating ruckus on the middle road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.