पाण्यावरून दोन महिलांमध्ये झालं कडाक्याचं भांडण, व्हिडीओ झाला व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:53 PM2021-04-07T13:53:43+5:302021-04-07T13:56:01+5:30
या दोन्ही महिलांनी हातांनी नाही तर हाड्यांनी एकमेकींना मारलं. व्हिडीओ पाहून हे नक्की समजतं की, दोन्ही महिलांचं भांडण पाण्यावरूनच झालं असेल.
ग्रामीण भागात नळावरची महिलांची भांडणं हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हे चित्र देशातील वेगवेगळ्या ग्रामीण भागात बघायला मिळतं. दोन किंवा त्यापेक्षा महिलांची भांडणं काहीना काही कारणांवरून होत असतात. असाच एक दोन महिलांचा पाणी भरताना झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन्ही महिलांनी हातांनी नाही तर हाड्यांनी एकमेकींना मारलं. व्हिडीओ पाहून हे नक्की समजतं की, दोन्ही महिलांचं भांडण पाण्यावरूनच झालं असेल.
तुम्ही लक्ष देऊन बघाल तर दोन महिला हांड्यांनी एकमेकींवर हल्ला करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ गगरी फाइट नावाने व्हायरल झाला आहे. हिंदीत गगरी म्हणजे हांडा. या भांडणाची सुरूवात तर हांड्यांनी हल्ला करण्यापासून होते. पण नंतर दोघीही एकमेकींचे केस खेचू लागतात.
#म्हारी छोरियां छोरों से कम हैं के.....
— Anamika amber'ainaa' انامیکا عنبر اوجھا۔ (@AnamikaamberA) April 7, 2021
अब तक आपने हथियार युद्ध और वाकयुद्ध देखा होगा...
अब देखिए "गगरी फाइट"#indianwoman#womenempowerment#desipic.twitter.com/XJMyg3kA80
व्हिडीओतील भांडण पाहून हसूही येईल आणि वाईटही वाटेल की, भारतात अजूनही पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात उत्तर भारतात पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. पाण्याबाबत राजस्थानमध्ये सर्वात जास्त अडचण निर्माण होते. त्यामुळे नेहमीच लोकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून गरजूंना पाणी मिळेल.