Viral Video : वर्कोहोलिक की वर्क प्रेशर… थिएटरमध्ये फिल्म पाहताना काम करताना दिसला, लोक म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:52 PM2023-04-28T13:52:46+5:302023-04-28T13:54:23+5:30

Man Working On Laptop In Theatre : सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती थिएटरमध्ये लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे.

Viral Video Workaholic or work pressure man working while watching movie in theatre bengaluru video | Viral Video : वर्कोहोलिक की वर्क प्रेशर… थिएटरमध्ये फिल्म पाहताना काम करताना दिसला, लोक म्हणाले…

Viral Video : वर्कोहोलिक की वर्क प्रेशर… थिएटरमध्ये फिल्म पाहताना काम करताना दिसला, लोक म्हणाले…

googlenewsNext

Man Working On Laptop In Theatre : काही असे लोक असतात ज्यांना एकावेळी अनेक कामं करायला आवडतं. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये लोक एकाच वेळी अनेक गोष्टी करताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती थिएटरमध्ये मुव्ही पाहताना लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती थिएटरमध्ये लॅपटॉवर काम करताना दिसत आहे. परंतु त्यावेळी चित्रपट सुरू झालेला दिसत नाही. अशा प्रकारे थिएटरमध्ये करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. ती व्यक्ती काम करताना एका व्यक्तीनं याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. हा बंगळुरूच्या चित्रपटगृहातील असल्याचं म्हटलं जातंय.

हा व्हिडीओ १० एप्रिल रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर bangalore_malayalis नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. असं केवळ बंगळुरूमध्ये पाहता येऊ शकतं, असं कॅप्शन याला देण्यात आलंय. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात लोकांनी कमेंटही केल्या आहेत. एकानं कमेंट करत त्यांची डेडलाईन आली असेलं असं म्हटलं. तर दुसऱ्यानं मी देखील अशा परिस्थितीत अडकलो होतो, असं कमेंट केलंय. हा सर्वात दु:खद व्हिडीओ असल्याचंही एका व्यक्तीनं म्हटलंय.

Web Title: Viral Video Workaholic or work pressure man working while watching movie in theatre bengaluru video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.