मोठ्याने लहान भाऊ वयात येण्याची वाट पाहिली, सहा सख्ख्या भावांनी केले, सहा बहिणींशी लग्न; ते ही फक्त ३० हजारांत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:55 IST2025-01-06T11:53:25+5:302025-01-06T11:55:31+5:30
सहा सख्खे भाऊ सहा सख्खा बहीणी लग्नाच्या असलेले स्थळ शोधत होते. यामुळे सर्वात मोठ्या भावाला खूप काळ वाट पहावी लागली होती.

मोठ्याने लहान भाऊ वयात येण्याची वाट पाहिली, सहा सख्ख्या भावांनी केले, सहा बहिणींशी लग्न; ते ही फक्त ३० हजारांत...
पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सहा सख्ख्या बहिणींशी सहा सख्ख्या भावांनी लग्न केले आहे. सहा भावांनी सहा बहिणींशी लग्न करण्याची ही पहिलीच वेळ असेल. या सहा जोडप्यांनी सामुहिक विवाह करत पैसेही मोठ्या प्रमाणावर वाचविले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सहा सख्खे भाऊ सहा सख्खा बहीणी लग्नाच्या असलेले स्थळ शोधत होते. यामुळे सर्वात मोठ्या भावाला खूप काळ वाट पहावी लागली होती. सहा सख्ख्या बहिणी एकाच घरात शोधून सापडत नव्हत्या. असल्या तरी कोणाचे ना कोणाचे लग्न झालेले होते किंवा वयाने खूपच लहान होत्या. तसेच वरांकडे देखील सर्वात छोट्या भावाची अडचण होती. तो वयात आला नव्हता. यामुळे सर्वात मोठ्याला अनेक वर्षे लग्नासाठी वाट पहावी लागली. इतरांचेही तेच झाले.
तिकडे मुलीकडेही सहा सख्ख्या बहिणी लग्नाच्या होत्या. परंतू, त्यांनी असे काही ठरविलेले नव्हते, की सहा सख्ख्या भावांशी लग्न करतील. परंतू, योगायोगाने ती संधी त्यांच्याकडे आली. सहाही मुली एकाच घरात एकाचवेळी नांदायला गेल्या आहेत.
6 بھائیوں کی ایک ہی دن 6 بہنوں کے ساتھ شادیاں ۔ انوکھی روایت قائم کر دی#MassMarriage#IjtemaiShadi#MassWedding#Jahez#WeddingCeremony#ViralVideo#Multanpic.twitter.com/cutjkJeRDN
— UrduPoint اردوپوائنٹ (@DailyUrduPoint) December 31, 2024
लग्नालाही जास्त लवाजमा बोलविण्यात आला नव्हता. १०० लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने लग्न लावण्यात आले. मोठ्या भावाने सांगितले की, लग्नात लोक एवढा खर्च करतात की जमिन विकतात, कर्ज काढतात आणि ते फेडत बसतात. आम्हाला ना आमच्यावर ना मुलीकडच्यांवर आर्थिक बोजा टाकायचा होता. यामुळे आम्ही साध्या पद्धतीने लग्न केले. या सहाही जोड्यांच्या लग्नासाठी १ लाख पाकिस्तानी रुपये खर्च झाला. आम्ही वधुपक्षाकडून हुंडाही घेतला नाही.