Viral Video: महिला वेटरने छेड काढणणाऱ्या तरुणांची केली यथेच्छ धुलाई, पुन्हा अशी हिम्मत करणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 08:02 PM2022-06-23T20:02:17+5:302022-06-23T20:05:44+5:30
एका महिला वेटरने पुरुष ग्राहकांची रेस्टॉरंटमध्येच धुलाई केली आहे (Woman fight video). या ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये असं काही केलं की महिला वेटर संतप्त झाली. रागात तिने रेस्टॉरंटमध्येच या ग्राहकांना धू धू धुतलं आहे (Girl Fight Video).
सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात (Social media viral video). सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एका महिला वेटरने पुरुष ग्राहकांची रेस्टॉरंटमध्येच धुलाई केली आहे (Woman fight video). या ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये असं काही केलं की महिला वेटर संतप्त झाली. रागात तिने रेस्टॉरंटमध्येच या ग्राहकांना धू धू धुतलं आहे (Girl Fight Video).
व्हिडीओत पाहू शकता दोन तरुण टेबलजवळ समोरासमोर बसले आहेत. एक महिला वेटर त्यांना खाणं सर्व्ह करतं आहे. ती त्या दोघांच्या मध्ये उभी आहेत. दोघांपैकी एक तरुण उठतो आणि महिला वेटरचा हात धरून तिला छेडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर महिला वेटरला इतका राग येतो ती त्याच्या तोंडावर रागात मुक्का मारते. महिलेच्या दोन मुक्क्यातच तो तरुण जमिनीवर कोसळतो.
महिलेने त्याला मारताच दुसरा तरुण त्याला वाचवण्यासाठी येतो आणि तोसुद्धा महिलेला मारायला जातो. महिला त्या तरुणाला लाथेने मारते. त्यानंतर तो तरुण खुर्ची घेऊन महिलेच्या दिशेने फेकतो. महिला ती खुर्ची आपल्या हातात पकडते आणि पुन्हा त्याला लाथ मारते त्यानंतर तो तरुणसुद्धा जमिनीवर कोसळतो.
Bruce lee 👍 @FunnymanPage@YoufeckingIdiotpic.twitter.com/JOWAuNrF0x
— 見外不怪 (@infchinesehumor) June 11, 2022
महिला वेटर एखाद्या प्रोफेशनल ज्युडो, कराटे एक्सपर्टप्रमाणे या दोन्ही तरुणांची धुलाई करते. या व्हिडीओमुळे अशी छेडछाड करणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा मिळाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर ते कोणत्याही महिलेला छेडण्याची हिंमतही करणार नाही. महिलेला छेडण्यापूर्वी दहा वेळा तरी विचार करतील.
LovePower ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिलेला धमकावणं बंद करा, इथं काय झालं आहे पाहा, असं कॅप्शन हा व्हिडीओ पोस्ट करताना ट्विटरवर देणअयात आलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, लाइक केला आहे. त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेकांनी महिलेच्या हिमतीचं कौतुक केलं आहे.