Video - फक्त 100 जागा अन् मुलाखतीसाठी आले 3 हजार उमेदवार; लावली भली मोठी रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 03:18 PM2024-01-31T15:18:26+5:302024-02-01T15:47:15+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
देशभरातील तरुण नोकरीच्या शोधात आपलं शहर सोडून इतर शहरांमध्ये फिरत आहेत. प्रत्येकाला नोकरी हवी असते, पण सध्या नोकरी मिळणं तितकच अवघड असतं. देशात बेरोजगारी किती प्रमाणात वाढली आहे, याचे ताजं उदाहरण आता समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका कंपनीचा आहे. जिथे जवळपास 100 जागा रिक्त होत्या, जवळपास 3000 लोक मुलाखतीसाठी आले होते. त्याचा परिणाम असा झाला की गर्दी इतकी वाढली की, कंपनीबाहेर तरुणांची रांग उभी असलेली पाहायला मिळाली. जिथे प्रत्येकजण हातात बायोडेटा घेऊन आपली वेळ येण्याची वाट पाहत असतो. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कंपनीच्या बाहेर देखील प्रचंड गर्दी आहे. उमेदवार त्यांचे बायोडेटा गोळा करत आहेत जेणेकरून ते त्यांना आतमध्ये पाठवता येतील. रांगेत उभी असलेली सर्व मुलं-मुली वाट पाहत असतात. व्हिडिओवर दिलेल्या टेक्स्टनुसार, 'ज्युनियर डेव्हलपर' पदासाठी सुमारे 100 रिक्त जागांची घोषणा करण्यात आली होती. मात्र मुलाखतीसाठी सुमारे तीन हजार लोक आले होते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'job4software' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
आतापर्यंत 8 मिलियनहून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एक लाखाहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. यावर काहींचं म्हणणं आहे की, देशातील बेरोजगारीची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. काहींनी वाढती लोकसंख्या देखील यामागचं कारण असल्याचं म्हटलं आहे.