५ सेकंदही पाहणं अवघड असलेला 'हा' व्हिडीओ १० लाख लोकांनी कसा पाहिला असेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 04:18 PM2019-10-15T16:18:26+5:302019-10-15T16:24:13+5:30
वेगवेगळ्या पक्ष्यांना अंड्यातून निघताना अनेकदा पाहिलं असेल. पण कधी तुम्ही कोळीच्या पिल्लांना अंड्यातून निघताना पाहिलं का? हा प्रश्न यासाठी विचारला कारण सोशल मीडियात एका व्हायरल होत आहे.
वेगवेगळ्या पक्ष्यांना अंड्यातून निघताना अनेकदा पाहिलं असेल. पण कधी तुम्ही कोळीच्या पिल्लांना अंड्यातून निघताना पाहिलं का? हा प्रश्न यासाठी विचारला कारण सोशल मीडियात एका व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक Egg Case आहे. ज्यात कोळीची अंडी आहेत. जेव्हा हे Case उघडलं गेलं तेव्हा त्यातून खूपसाऱ्या कोळी बाहेर आल्या. ऐकायला हे सगळं नॉर्मल वाटतं. पण व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.
हा व्हिडीओ गेल्या आठवड्यात १० ऑक्टोबरला Australian Reptile Park या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला होता. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना सूचना दिली होती की, कमजोर हृदयाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये.
हा व्हिडीओ सुरूवातीला फारच नॉर्मल वाटतो. पण नंतर जसाजसा व्हिडीओ पुढे जातो अंगावर शहारा येऊ लागतो आणि व्हिडीओ बघणं कठीण होतं. फेसबुक पेजवर सूचना देण्यात आल्यावरही हा व्हिडीओ १० लाख लोकांनी पाहिलाय. तर ८ हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.