खतरनाक अ‍ॅनाकोंडा आणि मगरीच्या फाइटचा व्हिडीओ व्हायरल, पाहूनच उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:25 PM2022-07-18T13:25:26+5:302022-07-18T13:26:08+5:30

Anaconda and Alligator Fight: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मगर स्वत:ला वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अॅनाकोंडा तिला सोडायला तयार नाही. दोन्ही जीवांमध्ये झालेली ही फाइट गेल्यावर्षी सप्टेंबरची आहे.

Watch anaconda and alligator survival fight captured on camera | खतरनाक अ‍ॅनाकोंडा आणि मगरीच्या फाइटचा व्हिडीओ व्हायरल, पाहूनच उडेल थरकाप

खतरनाक अ‍ॅनाकोंडा आणि मगरीच्या फाइटचा व्हिडीओ व्हायरल, पाहूनच उडेल थरकाप

Next

Anaconda and Alligator Fight: जगात एकापेक्षा एक खतरनाक जीव आहेत. ते इतके खतरनाक असतात की, सेकंदात कुणाचाही जीव घेतील किंवा सेकंदात तुम्हाला गिळतील. अशात जर जगातल्या दोन खतरनाक जीवांचा आमनासामना झाला तर काय होणार? याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका विशाल हिरव्या रंगाच्या अ‍ॅनाकोंडाने मगरीला पकडलं आहे. हा व्हिडीओ ब्राझीलचा आहे. व्हिडीओत दोन्ही जीव जगण्यासाठी लढत आहेत. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मगर स्वत:ला वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अ‍ॅनाकोंडा तिला सोडायला तयार नाही. दोन्ही जीवांमध्ये झालेली ही फाइट गेल्यावर्षी सप्टेंबरची आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला. दोघांमधील खतरनाक फाइट  कॅमेरात कैद करण्यात आली. ही घटना अमेरिकेच्या इंडियानामध्ये राहणाऱ्या वालेकिम सुल्लीवान यांनी कॅमेरात कैद केली. आफ्रिकन वाइल्ड लाइफ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, हा काही अजगर नाही, ब्राझीलियन अजगरही नाही.  त्याहून मोठा अ‍ॅनाकोंडा आहे. 550 पाउंड वजन असलेल्या या अ‍ॅनाकोंडा आणि मगरीच्या जबरदस्त फाइटनंतर सोशल मीडियावर वाद पेटला. एका यूजरने लिहिलं की, लढाईत कुणाची हार झाली?

काही यूजर म्हणाले की, दोघेही नंतर थकले असतील आणि दोघेही निघून गेले असतील. शनिवारी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. ज्याला आतापर्यंत 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 6800 हजार लाइक्स मिळाले.

Web Title: Watch anaconda and alligator survival fight captured on camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.