Viral Video: तब्बल ४० मगरींच्या विळख्यात सापडलेला जंगलाचा राजा, व्हिडिओचा शेवट पाहुन होईल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:34 PM2022-06-16T19:34:24+5:302022-06-16T19:37:10+5:30
सध्या सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ (Lion and Crocodile Fight) व्हायरल होत आहे. जंगलाचा राजा असलेल्या सिंहासमोर कोणताही प्राणी टिकू शकत नाही. मात्र जेव्हा हे प्राणी गटाने हल्ला करतात, तेव्हा सिंहालाही मागे हटावं लागतं.
सोशल मीडियावर तुम्हाला जंगलातील अनेक व्हिडिओ पाहायला मिळत असतील. यातील काही व्हिडिओ थरकाप उडवणारे असतात तर काही व्हिडिओ मनाला स्पर्शून जाणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ (Lion and Crocodile Fight) व्हायरल होत आहे. जंगलाचा राजा असलेल्या सिंहासमोर कोणताही प्राणी टिकू शकत नाही. मात्र जेव्हा हे प्राणी गटाने हल्ला करतात, तेव्हा सिंहालाही मागे हटावं लागतं.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं. ज्यामध्ये एक सिंह अनेक मगरींच्या मध्ये अडकल्याचं पाहायला मिळतं. यानंतर आपला जीव वाचण्यासाठी सिंह असं काम करतो, जे पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.
फॅक्ट्स टेल नावाच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सिंह मगरीपासून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो एका पाणघोड्यावर उभा आहे आणि त्याला 40 पेक्षा जास्त मगरींनी वेढलं आहे. आपला जीव वाचवण्यासाठी सिंह बराच वेळ मागे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो, पण सिंहालाही कळतं की तो याठिकाणी जास्त काळ राहू शकत नाही. त्यामुळे त्याला लवकरात लवकर पाण्याच्या काठावर पोहोचायचं असतं. मात्र किनाऱ्यावर जाण्यासाठी त्याला मगरींच्या मधूनच जावं लागणार होतं. अशात संधी मिळताच हा सिंह मगरींवरच उडी घेतो आणि पाण्यातून सुखरूप किनाऱ्यावर पोहोचतो.
जेव्हा सिंहाने उडी मारली तेव्हा अनेक मगरींनी त्याचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या तावडीतून सिंह सुखरूप बाहेर पडला. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सिंह मोठ्या संकटातून आपला जीव वाचवून कसा बाहेर आला हे दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'मगरांनी घेरलेलं असूनही सिंह पाण्यातून बाहेर पडला.' व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना केनियातील मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमधील आहे. यात 40 हून अधिक मगरींनी वेढलेला सिंह दाखवला आहे. हा व्हिडिओ कधी शूट करण्यात आला हे स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत 3,500 वेळा पाहिला गेला आहे.