Video : 'तिनं' झाडू तोडल्यानं 'तो' भडकला, कारच्या बोनेटला लटकला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 12:45 PM2018-10-03T12:45:17+5:302018-10-03T12:50:59+5:30

एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेचं सफाई कामगारासोबत भांडणं झालं आणि या महिलेने कारच्या बोनटवर अडकून बसलेल्या व्यक्तीला १३ किमीपर्यंत तसंच घेऊन गेली. 

Watch Video : Woman drives 13 km with man on car after road rage incident | Video : 'तिनं' झाडू तोडल्यानं 'तो' भडकला, कारच्या बोनेटला लटकला; अन्...

Video : 'तिनं' झाडू तोडल्यानं 'तो' भडकला, कारच्या बोनेटला लटकला; अन्...

Next

(Image Credit : YouTube Grab)

बीजिंग : रस्त्यांवर होणारी भांडणं, त्यातून होणारी हाणामारी ही आता रोजची सामान्य बाब झाली आहे. काही लोकांना इतका राग येतो की, ते एखाद्याचा जीवही घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेचं सफाई कामगारासोबत भांडणं झालं आणि या महिलेने कारच्या बोनटवर अडकून बसलेल्या व्यक्तीला १३ किमीपर्यंत तसंच घेऊन गेली. 

सोशल मीडियात सध्या या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, सफाई कामगार रस्त्यावर झाडू मारत होता. तेव्हाच काही कारणाने त्याची महिलेसोबत बाचाबाची झाली. अशातच महिला संतापली आणि तिने रागाच्या भरात सफाई कामगाराचा झाडू तोडला. नंतर हा वाद चांगलाच पेटला, पण हे भांडण इथेच थांबलं नाही. 

भांडण वाढल्यावर ती महिला तिच्या कारमध्ये बसून जाऊ लागली. इतक्यात हा सफाई कामगार गाडीच्या बोनटवर चढला. त्याच्या हातात तोडलेला झाडूही होता. महिलेचा पारा आणखीनच चढला आणि तिने त्याला खाली उतरवण्याऐवजी गाडी आणखी वेगाने पळवली. 
या महिलेने त्याला चक्क १३ किमीपर्यंत त्याच अवस्थेत नेले.

जेव्हा तिच्या लक्षात आलं की, तो सफाई कामगार गाडीच्या खाली उतरत नाहीये तर ती गाडी थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली. महिलेने केलेल्या या कृत्यावर सोशल मीडियातून टिकाही होत आहे. यात त्या व्यक्तीचा जीवही गेला असता. दुसरीकडे पोलसी स्टेशनला जाणं महिलेला चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी त्या महिलेला १० दिवसांची कोठडी आणि ७१ डॉलर(५२०० रुपये) चा दंडही ठोठावला. 

Web Title: Watch Video : Woman drives 13 km with man on car after road rage incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.