Video : दफन केल्यानंतर कबरेतून येऊ लागला आवाज, 'मला बाहेर काढा!'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:41 AM2019-10-15T11:41:23+5:302019-10-15T11:44:55+5:30
जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा नातेवाईकांच्या, मित्रांच्या डोळ्यातून अश्रू येतात. काही लोक त्या व्यक्तीला आठवूण रडतात तर काही त्यांच्याबाबत बोलून त्यांची आठवण काढतात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा नातेवाईकांच्या, मित्रांच्या डोळ्यातून अश्रू येतात. काही लोक त्या व्यक्तीला आठवूण रडतात तर काही त्यांच्याबाबत बोलून त्यांची आठवण काढतात. पण एका स्मशानभूमीत एक वेगळीच घटना बघायला मिळाली. Shay Bradley आता या जगात नाहीत. त्यांच्या कॉफीन तयार करण्यात आलं. सगळे लोक त्यांना स्मशानभूमीत घेऊन गेले. तिथे गेल्यावर एक रेकॉर्डिंग वाजवली गेली, ही रेकॉर्डिंग स्वत: Shay Bradley यांनी रेकॉर्ड केली होती. ही रेकॉर्डिंग ऐकून तिथे उपस्थित लोक रडता-रडता अचानक हसू लागले.
Shay Bradley यांची मुलगी Andrea Bradley ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ह ऐकू शकता की, Shay कबरेतून आवाज देत आहेत. आता तुम्ही म्हणाल कसं? तर Shay यांनी त्यांची लास्ट स्पीच रेकॉर्ड करून ठेवली होती. हीच तिथे स्मशानभूमीत ऐकवण्यात आली.
'मला बाहेर काढा, इथे खूप अंधार आहे'
या रेकॉर्डिंगच्या ऑडिओमध्ये असं वाटत आहे, जणू Shay हे कॉफीनमध्ये प्रत्यक्षात बोलत आहेत. 'मला येथून बाहेर काढा, इथे फार अंधार आहे. हॅलो...तुम्ही ऐकताय ना'. हे शब्द नातेवाईकांच्या कानावर पडले आणि रडता-रडता सगळे हसू लागले.
लोकांनी सांगितले की, Shay फारच दिलखुलास व्यक्ती होते. त्यांना लोकांची फिरकी घेणे फार आवडत होते. ते जाता-जाताही लोकांची फिरकी घेऊन गेले.