क्या बात! जुगाड करुन बाइकसारखी पळवली सायकल, व्हिडीओ झाला व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 02:36 PM2019-04-10T14:36:24+5:302019-04-10T14:36:33+5:30
दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहेत. सोबत प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही वापर वाढत आहे.
दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहेत. सोबत प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही वापर वाढत आहे. म्हणजे विजेवर चालणाऱ्या कार-बाइकचा वापर. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने सायकलची मोटर बाइक तयार केली आहे. त्याचाच हा व्हिडीओ.
महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी लिहिले की, 'आम्ही इकडे ई-बाइकवर काम करत आहोत आणि या व्यक्तीने त्याच्या टू-व्हीलरसाठी एक आयडिया शोधून काढली आहे. पाहून असं वाटतं की, हा जुगाड फक्त भारतीयांसाठीच नाहीये. मला विश्वास द्यायचा आहे की, मी हा जुगाड कॉपी करणार नाही'.
While we’re all working on e-bikes,this gent has found an alternate mode of propulsion for his two wheeler...Seems like Indians aren’t the only ones with a gift for Jugaad! (I assure you we don’t plan to copy him: don’t think his device will pass emission or noise limits) pic.twitter.com/sQLJskTcnS
— anand mahindra (@anandmahindra) April 9, 2019
या व्हिडीओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, एका व्यक्तीने त्याच्या पाठीवर मोटर असलेला पंखा लावला आहे. हातात अॅक्सेलेटर आहे. ते दाबलं की, मोटर आणि पंखा वेगाने फिरतो. सायकलला बॅलन्स केल्यावर ही व्यक्ती अॅक्सेलेटर प्रेस करतो ज्यामुळे पंखा वेगाने फिरु लागतो. त्यातून निघणारी हवा त्याला पुढे ढकलते आणि सायकल मोटर बाइकच्या वेगाने पुढे सरकते. खरंच ही आयडिया कमाल आहे.