Viral Video: अमेरिकेत आढळला एलियन; CCTV कॅमेऱ्यात दिसला विचित्र प्राणी, पाहा चकीत करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:45 PM2022-07-19T18:45:36+5:302022-07-19T18:46:03+5:30

Viral Video: आतापर्यंत एलियन दिसल्याचे दावे अनेक देशातील लोकांनी केले आहेत. आता अमेरिकेत एलियन दिसल्याचा दावा करण्यात येतोय.

Watch Viral Video of Spooky Pale Creature Caught On Camera In Us, People Says Aliens | Viral Video: अमेरिकेत आढळला एलियन; CCTV कॅमेऱ्यात दिसला विचित्र प्राणी, पाहा चकीत करणारा व्हिडिओ

Viral Video: अमेरिकेत आढळला एलियन; CCTV कॅमेऱ्यात दिसला विचित्र प्राणी, पाहा चकीत करणारा व्हिडिओ

googlenewsNext

वॉशिंग्टन: आतापर्यंत एलियन दिसल्याचे दावे अनेक देशातील लोकांनी केले आहेत. या दाव्यांमध्ये अमेरिका सर्वात पुढे आहे. आता परत एकदा अमेरिकेत एलियन दिसल्याचा दावा करण्यात येतोय. अमेरिकेतील केंटकी येथील एका घराबाहेर बसवण्यात आलेल्या सुरक्षा कॅमेऱ्यात एक विचित्र प्राणी कैद झाला आहे. 

घरमालकाने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. व्हिडिओमध्ये घराबाहेर सामान्य प्राण्यांपेक्षा एक विचित्र प्राणी दिसतोय. हा काही लोक त्याला एलियन म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारा हा प्राणी कोणता आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. काही लोकांनी या व्हिडिओच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

व्हिडिओमध्ये काय दिसले
Paranormality मासिकाने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक भितीदायक दिसणारा प्राणी मोरेहेड, केंटकी येथील रस्त्यावरून चालताना दिसत आहे. हा प्राणी वाकून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये या प्राण्याभोवती उभ्या असलेल्या गाड्याही स्पष्ट दिसत आहेत. मात्र, हा प्राणी वाहनांजवळ जाण्याऐवजी जमिनीवर पडलेल्या वस्तूचा शोध घेत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीची ही घटना सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झाली.

हा व्हिडिओ 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे
Paranormality Magazine ने शेअर केलेला व्हिडिओ 6 लाख 35 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही लोकांचा दावा आहे की, तो एलियन असू शकतो, तर काहींनी तो व्हिडिओ फसवा असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Watch Viral Video of Spooky Pale Creature Caught On Camera In Us, People Says Aliens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.