बर्फाने गोठलेल्या तलावात उडी घेऊन 'त्याने' वाचवला कुत्र्याचा जीव!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 02:56 PM2019-01-04T14:56:06+5:302019-01-04T14:57:23+5:30
वेगवेगळ्या प्राण्याचे जीव आपला जीव धोक्यात टाकून वाचल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियात पाहिले असतील.
वेगवेगळ्या प्राण्याचे जीव आपला जीव धोक्यात टाकून वाचल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियात पाहिले असतील. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतील तुर्कीतील एका पोलिसाचं चांगलंच कौतुक होत आहे. कारण त्याने बर्फाने गोठलेल्या तलावात अडकलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला.
तुर्कीतील वेन तलावात एक कुत्रा झटपटत असलेला दिसला. पोलीस डायवर म्हणजेच स्वीमर बुराक ओकटेन तिथे आला आणि बर्फाने गोठलेल्या तलावात त्याने कुत्र्याला वाचवण्यासाठी उडी घेतली. बर्फ इतका गोठला होता की, त्याला तो हाताने तोडतानाही फार शक्ती लावावी लागत होती. पण त्याने जीवाची पर्वा न करता कुत्र्याचा जीव वाचवला.
Birkaç gün önce Van'da gölde buzların kırılması sonucu mahsur kalan ve dalgıç polis #burakökten tarafından kurtarılan ufaklık iyileşti, ismi BUZ oldu ve onu kurtaran kahraman, ona yuvasını da açtı. @vanbuyuksehirbb , vet.hek. @ahismail101 ve emeği geçen herkese teşekkür ederiz. pic.twitter.com/VWBiyRPlIo
— DünyadaHayvanHakları (@dunyadahh) December 28, 2018
महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुराकने नंतर या कुत्र्याला पाळले. त्याचं नाव त्याने 'बज' असं ठेवलं. तुर्की भाषेत 'बज'चा अर्थ 'बर्फ' असा होतो.