VIDEO : क्रोएशिया - प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच आला मोठा भूकंप, पुढे जे झालं ते बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 03:20 PM2020-12-30T15:20:26+5:302020-12-30T15:21:01+5:30

क्रोएशियामध्ये मंगळवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. राजधानी जगरेबच्या दक्षिण-पूर्व भागात बरंच नुकसान जालं. मिळालेल्या महितीनुसार, यात सहा लोकांचा मृत्यू झाला.

Watch when earthquake hits Croatia video will shock you | VIDEO : क्रोएशिया - प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच आला मोठा भूकंप, पुढे जे झालं ते बघाच....

VIDEO : क्रोएशिया - प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच आला मोठा भूकंप, पुढे जे झालं ते बघाच....

googlenewsNext

क्रोएशियामध्ये मंगळवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. राजधानी जगरेबच्या दक्षिण-पूर्व भागात बरंच नुकसान जालं. मिळालेल्या महितीनुसार, यात सहा लोकांचा मृत्यू झाला. २० पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत. काहींची स्थिती गंभीर आहे. तर रेस्क्यू टीम बचावकार्य करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. म्हणजे जेव्हा भूकंपाचा धक्का बसाल तेव्हा सगळेच हैराण झाले होते.

हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यात बघू शकता की, रोडच्या बाजूला यात एक पत्रकार परिषद सुरू आहे. आजूबाजूला काही लोक उभे आहेत. आणि अचानक भूकंप येतो. सगळं काही हलू लागतं.  एकाएकी जोरदार धमाक्याचा आवाज येतो. ३० सेकंदाच्या या व्हिडीओत लोकांचा आवाजही ऐकायला मिळतो. काही वेळात भूकंपाचे धक्के बंद होतात.

अनेक ट्विटर यूजर्सने यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी क्रोएशियासाठी प्रार्थना केली होती. काही लोकांनी लिहिले की, हे त्यांच्यासाठी नवीन वर्ष आहे. तर अनेकांनी या दु:खद घटनेत ते त्याच्यासोबत असल्याचं म्हणाले.

आमचीही हीच प्रार्थना आहे की, लोकांनी अशावेळी अशीच एकमेकांची मदत करावी. लवकरच तिथे सगळं काही व्यवस्थित होईल. या दु:खाच्या स्थितीत क्रोएशियासोबत आम्हीही आहोत.
 

Web Title: Watch when earthquake hits Croatia video will shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.