'अशी' आई असणारी आमची शेवटची पिढी, पाहा भावुक पोस्टमध्ये काय म्हणाले आयएएस ऑफिसर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:40 PM2022-05-17T16:40:13+5:302022-05-17T16:44:39+5:30
त्यांनी या कवितेतुन त्या पीढीच्या आईबद्दल भाष्य केले आहे जी सोशल मिडिया, स्मार्टफोनपासुन कोसो दुर आहे. तिला या बाबत काही कल्पना किंवा माहितीही नाही. हेच तिचे निरागसपण आहे असे कवी म्हणतो.
असं म्हणतात स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी. एका आयएएस अधिकाऱ्याने या आईबद्दलच अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट म्हणजे एका कागदावर लिहिलेली कविता आहे. ही कविता त्यांनी आईला समर्पित करत आईच्या भावविश्वाला स्पर्श केला आहे. त्यांनी या कवितेतुन त्या पीढीच्या आईबद्दल भाष्य केले आहे जी सोशल मिडिया, स्मार्टफोनपासुन कोसो दुर आहे. तिला या बाबत काही कल्पना किंवा माहितीही नाही. हेच तिचे निरागसपण आहे असे कवी म्हणतो.
हम वो आखिरी पीढी है जिसकी एसी मासुम माँ है जिनका सोशल मिडियापर कोई अकाऊंट है. ना फोटो, ना सेल्फी का शॉक है. उन्हे यह भी नही पता की स्मार्टफोन का लॉक कैसे खुलता है. जिनको ना अपनी जन्मतिथी का पता है. उन्होने बहुतही कम सुख-सुविधा में अपना जीवन बिताया है. बिना किसी शिकायत किये. हाँ हम आखिरी पीढी है जिनके पास ऐसी माँ है. असं त्या कागदावर लिहिलेलं आहे.
❤️✌️ pic.twitter.com/f0RJGOxJhH
— Arpit Verma IAS (@arpit_verma13) May 16, 2022
आजच्या काळात असे अनेक वृद्ध माता पिता आहेत ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही. त्यांना सोशल मिडिया काय आहे हे माहितही नसतं. त्यांच्यासाठी ही कविता आहे. ही पोस्ट व्हायरल होताच अनेकजण यावर कमेंट टाकत आहेत की खरंच ही शेवटची पीढी आहे. आयएएस ऑफिसर अर्पित वर्मा यांनी हा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.